मराठा मोर्चाच्या नावाने जगन्नाथ रथ यात्रेच्या गर्दीचा फोटो व्हायरल; वाचा सत्य

Update: 2024-01-27 12:47 GMT

मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी रोजी सुरु झालेल्या पदयात्रेचा मुक्काम 25 तारखेला नवी मुंबई शहरात होणार असून या मोर्च्यात लाखोच्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला आहे. 

या पर्श्वभूमीवर एका विराट गर्दीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, व्हायरल फोटो मराठा दिंडी मोर्चाचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो मराठा दिंडी मोर्च्याचा नाही. ही गर्दी ओडिशातील जगन्नाथ रथ यात्रेची आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर आलेले दिसतात.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मराठ्यांचा महाप्रलय पुण्यात ७० किलोमीटर ची विक्रमी रांग आता मुंबईत विश्वविक्रम करु जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा लीडर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील,पुण्याच्या वेशीवर मराठ्यांचा महापूर शिक्रापूर.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो मधिल गर्दी मराठा दिंडी मोर्च्याची नसून एका रथ यात्रेची आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी 20 जून 2023 रोजी अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काही फोटो अपलोड केले होते. त्या पैकी हाच फोटो होता. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “भक्त आणि देवचे अतुलनीय मिलन. जय जगन्नाथ.”

खालील ट्विटमध्ये आपण व्हायरल फोटो पाहू शकता.

https://twitter.com/Naveen_Odisha/status/1671178778842890241?s=20

एएनआयने सात महिण्यांपूर्वी 21 जून रोजी याच जगन्नाथ मंदिराच्या रथ यात्रेचा व्हिडिओ युट्यूबर शेअर केला होता.

https://youtu.be/xMbQ-To6zwY?si=06Nx1TFm4ChjElzL&t=92

मराठा दिंडी मोर्चा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी या गावातून निघालेली मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. सध्या जरांगे पाटील आणि दिंडी मोर्चातील सहभागील लोणावळ्यात असून तेथे सभेचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

खालील व्हिडिओमध्ये आपण सभेच्या पूर्वतयरीत असंख्य लोकांचा सहभाग पाहू शकतात.

https://youtu.be/ursp1R9dlpo?si=v5c4SwrKwCsZj0ZZ&t=123

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो मराठा मोर्चाचा नाही. ही गर्दी ओडिशातील जगन्नाथ मंदिराच्या रथ यात्रेची आहे. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:मराठा मोर्चाच्या नावाने जगन्नाथ रथ यात्रेच्या गर्दीचा फोटो व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Tags:    

Similar News