स्फोटाचा जुना व्हिडिओ दहशतवादी मसूद अझहरच्या कथित मृत्युशी जोडून व्हायरल; वाचा सत्य

Update: 2024-01-04 10:13 GMT

पाकिस्तानमध्ये गँगस्टर दाऊद इब्राहिमवरील विषप्रयोगाच्या अफवेनंतर आता पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी मसूद अझहरच्या कथित मृत्यूची चर्चा समोर येत आहे. पुरावा म्हणून एका बॉम्ब स्फोटाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, याच हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा मृत्यू झाला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या स्फोटाचा आहे. तसेच मसूद अझहरच्या मृत्युची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

काय आहे दावा ?

बाजारपेठेत बॉम्ब स्फोटाचा व्हिडिओ शेअर करून युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “मोठी बातमी, कंदाहार विमान अपहरण केलेला आतंकवादी मसुद अजहरला अज्ञात लोकांनी बॉम्ब स्फोटात उडवला.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडिओतील कीफ्रेम्सला रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ जुना आहे.

ओएसआयएनटी अपडेट्स या ट्विटर अकाउंटने 3 नोव्हेंबर 2023 रोजी हा व्हिडिओ शेअर करून माहिती दिली होती की, पाकिस्तानमधील ‘डेरा इस्माईल खान’ शहरामध्ये पोलिस व्हॅनवर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 6 जण ठार तर 25 जण जखमी झाले होते.

https://twitter.com/OsintUpdates/status/1720412915940168038?s=20

एपी वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील ‘डेरा इस्माईल खान’ शहरात हा स्फोट झाला होता. एका मोटारसायकलमध्ये बॉम्ब लपवून अधिकाऱ्यांच्या पोलिस बसला लक्ष्य करण्यात आले होते.

मूळ पोस्ट – एपी न्यूज 

मसूदच्या मृत्यूची अफवा

भारतासाठी मोस्ट वॉटेंड दहशतवादी मसूद अजहर पाकिस्तानमध्ये एक जानेवारी रोजी एका बॉम्बस्फोटात मारला गेला, असा सोशल मीडियावर चर्चा आहे.

परंतु, भारत आणि पाकिस्तान सरकारतर्फे अद्याप याबाबत कोणताही माहिती जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मसूदचा मृत्यू झाला की नाही याची पुष्टी झालेली नाही.

कोण आहे मसूद?

पाकिस्तानमध्ये राहणारा मसूद अझहर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आहे. भारतात संसदेवरील हल्ला (2001) आणि पुलवामा हल्ला (2019) यांसारख्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल स्फोटाचा जुना व्हिडिओ चुकीच्या माहितीसह शेअर केला जात आहे. दहशतवादी मसूद अजहरच्या मृत्यूची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:स्फोटाचा जुना व्हिडिओ दहशतवादी मसूद अझहरच्या कथित मृत्युशी जोडून व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News