महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आली नाही; जुन्या बातमीचा व्हिडिओ व्हायरल

Update: 2023-09-21 17:02 GMT

सोशल मीडियावर एबीपी न्यूजची बातमी व्हायरल होत आहे की, ज्यामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, असा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणी अंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2019 मधील बातमीचा आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन व्हिडिओ क्लिप्स दिसतात.

पहिल्या क्लिपमध्ये बातमी दिली आहे की, “राज्यपालांच्या शिफारशीवरुन महाराष्ट्रात आज पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.”

तसेच दुसऱ्या क्लिपमध्ये लालू प्रसाद यादव पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना दिसतात.

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडिओ क्र. 1

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, ही बातमी 3 वर्षांपूर्वीची आहे.

एबीपी न्यूनने 12 नोव्हेंबर 2019 रोजी बातमी दिली होती की, “राज्यपालाच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात आज पासून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परवानगी दिली.”

https://youtu.be/WSz7fWmOszI?si=4IseLjmSSrljN42o

टीव्ही 9 मराठीच्या बातमीनुसार 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचा (भाजप-शिवसेना) विजय झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगळे झाले. परंतु, दोन्ही पक्षांचे संख्याबळ कमी असल्याने तत्कालिन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तेव्हा महाराष्ट्रातील पक्षांना संख्याबळ सिद्ध करण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली होती.

परंतु, एकाही पक्षाने पुरेसे संख्याबळ न दाखवल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद शिफारसी पत्र दिले होते.

कोश्यारींचा राजीनामा

फेब्रुवारी 2023 मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपतींना राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी 12 फेब्रुवारी रोजी राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

व्हिडिओ क्र. 2

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, लालू प्रसाद यादव यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केलेल्या टीकेचा व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीची आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मोदी आता एनआरआय झाले आहेत: लालू यादव यांचा जोरदार हल्ला.”

https://youtu.be/b_E0AT03TYQ?si=mGFPHx0Yt-bsgYn3

आमर उजालाच्या बातमीनुसार 2014 मध्ये झारखंडमधील विधानसभा निवडणुक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा समाचार घेत “आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरआय झाले असून त्यांना देशातील जनतेची चिंता नाही.” असा टोमणा मारला होता.

इंडिया आघाडी सध्या

विरोधी आघाडी इंडियाच्या बैठकीनंतर 1 सप्टेंबर 2023 रोजी लालू प्रसाद यादव यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधताना म्हणाले की, “भाजपला हटवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून ही लढाई लढत आहोत.”

तसेच त्यांनी भाजप शब्दाचा अर्थ सांगताना ‘भाजप जलाओ पार्टी’ असा उल्लेख करतात. अधिक माहिती येथे पाहू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ जुने आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. तसेच 2014 मध्ये लालू प्रसाद यादव यांनी “आता पंतप्रधान नरेंद्र मोदी एनआरआय झाले आहेत” अशी टीका केली होती. चुकीच्या दाव्यासह जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट जाहीर करण्यात आली नाही; जुन्या बातमीचा व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News