प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक बुद्धीबळ विश्वचषक पटकाविला का? वाचा सत्य

Update: 2023-08-24 17:21 GMT

सध्या बुद्धीबळ विश्वचषकामध्ये भारतीय बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानंद आणि नॉर्वेच्या मॅग्नेस कार्लसन यांच्यापैकी कोण बाजी मारणार सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागल्या की, प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक विजेतेपद मिळवले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या पोस्ट्स आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. बुद्धीबळाच्या फिडे वर्ल्डकप चषकाच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदचा पराभव झाला.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “प्रत्येक भारतीयांसाठी अजून एक आनंदाची बातमी. आर. प्रज्ञानंद या भारताच्या सर्वात लहान ग्रँड मास्टर ने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत 1 नंबर च्या मॅग्नस कार्लसन चा पराभव करून जागतिक विजेतेपद पटकावले”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2023 बद्दलची अधिकृत माहिती तपासली. त्यातून कळाले की, प्रज्ञानंदाचा कार्लसनविरुद्धच्या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये पराभव झाला. दोघांमधील अंतिम स्कोर कार्लसन (1.5) तर प्रज्ञानंदसाठी (0.5) असा राहिला होता.

https://twitter.com/FIDE_chess/status/1694675977463386401

लोकसत्ताच्या बातमीनुसार, पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने आपल्या खेळाची शैली बदलली आणि प्रज्ञानंदकडे याचे उत्तर नव्हते. त्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत प्रज्ञानंदचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, “FIDE विश्वचषकातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रज्ञनंदाचा आम्हाला अभिमान आहे! त्याने मॅग्नस कार्लसनला कडवी झुंज दिली. हा काही छोटा पराक्रम नाही.”

https://twitter.com/narendramodi/status/1694697761889734976

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, प्रज्ञानंदने कार्लसनचा पराभव केला हा दावा चुकीचा आहे. मूळात फिडे बुद्धीबळ विश्वचषकामध्ये कार्लसन विजेता ठरला. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:प्रज्ञानंदने कार्लसनला पराभूत करून जागतिक बुद्धीबळ विश्वचषक पटकाविला का? वाचा सत्य

Written By: Agastya Deokar

Result: False

Tags:    

Similar News