बांगलादेशमध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली नाही; जुना फोटो व्हायरल

Update: 2024-08-07 17:07 GMT

बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये विविध अनेक ठिकाणी हल्ले होत असल्याचे वृत्त समोर येत आहे. अशा पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका फोटोसह दावा केला जात आहे की, बांगलादेशमधील विद्यार्थ्यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचे विटंबना केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो गेल्या वर्षीचा असून ढाका विद्यापीठातून टागोरांचा पुतळा हटवताना अशी हानी झाली होती.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये रविंद्रनाथ टागोर यांचा तुटलेला पुतळा दिसतो.

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेशचे राष्ट्रगीत अमर_सोनार_बांगला आहे, जे रवींद्रनाथ टागोर यांनी 1906 मध्ये लिहिले होते, आज तेथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे.” (भाषांतर)

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो गेल्या वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

पुणे मिरर वेबसाईटने हाच फोटो 18 फेब्रुवारी 2023 रोजी अपलोड केला होता.सोबतच्या बातमीनुसार, ढाका विद्यापीठाने पुस्तक मेळाव्यावर बंदी घातल्यावर विद्यार्थ्यांनी टागोरांचा प्रतिकात्मक पुतळा विद्यापीठ परसरात बसविला होता. विद्यापीठ प्रशासनाकडून हा पुतळा हटविताना पुतळ्याची हानी झाली होती. काही दिवसांनी जवळच्या आवारात पुतळ्याचे हे शीर आढळले होते.

काय होते प्रकरण?

ढाका विद्यापीठाने ‘अमर एकुशे पुस्तक मेळाव्यात’ पुस्तकांवर बंदी आणली होती. विद्यापीठाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ ढाका विद्यापीठ छात्र संघाने रविंद्रनाथ टागोरांचा प्रतिकात्मक पुतळा तयार केला होता. या पुतळाच्या तोंडाला टेप आणि हातातील पुस्तका खिळे ठोकले ठोकले होते.

विद्यापाठीने मात्र तो पुतळा कॅम्पसमधून हटविला. त्यानंतर विद्यार्थी संघटनांने ‘टागोर हरवले’ असे आंदोलनदेखील केले. या वेळेसही ढाका विद्यापीठ प्रशासनाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.

मुळ पोस्ट – द प्रिंट

काही काळानंतर विद्यार्थ्यांना कॅम्पसभोवती पुतळ्याचे अनेक भाग सापडले. ते जोडून विद्यार्थ्यांनी पुन्हा तो पुतळा तयार केला. अधिक महिती आपण येथेयेथे पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो 2023 मधील आहे. सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा दावा चुकीचा आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.container {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.container::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.container img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.container span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.container {

text-align: center;

}

.container img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:बांगलादेशमध्ये रविंद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली नाही; जुना फोटो व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News