महाराष्ट्रात गुटख्यात कोरोनाचा विषाणू सापडला का? वाचा सत्य

Update: 2020-03-10 10:59 GMT

पुण्यात कोरोनाचे दोन रूग्ण आढळले आहेत. जगभरातील 105 देशात एक लाख दहा हजारहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच महाराष्ट्रात गुटख्यामध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याचा एक संदेश सध्या समाजमाध्यमात पसरत आहे. 123 धाराशीव न्यूज या पेजवरही असाच संदेश पोस्ट करण्यात आला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

फेसबुकवरील मुळ पोस्ट

तथ्य पडताळणी

महाराष्ट्रात गुटख्यामध्ये कोरोनाचा विषाणू सापडले, असे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही टीव्ही 9 मराठीच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी असे कोणतेही वृत्त आम्हाला दिसले नाही. त्यानंतर महाराष्ट्रात गुटखा बंदी असून लोकांना गुटखा न खाण्याचे सरकारचे आदेश हे जुनेच असल्याचे दिसून आले. या स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे गुटख्याचे छायाचित्र हे 14 डिसेंबर 2015 पासून आयएएनएस या वृत्तसंस्थेकडे उपलब्ध असल्याचे दिसून येते. यातुन या सर्व बाबी संपादित करुन हे ग्राफिक तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंमध्ये कोरोना व्हायरस असतो. त्यामुळे विषाणूची बाधा होऊ शकते, हे एक मिथक असल्याचे स्पष्ट केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=jvqn7C2EFpE

Archive

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसबाबत केलेले मार्गदर्शन आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

महाराष्ट्रात गुटख्यात कोरोनाचा विषाणू सापडला असे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिलेले नाही. हे ग्राफिक संपादित केलेले आहे. असत्य माहितीसह ते समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:महाराष्ट्रात गुटख्यात कोरोनाचा विषाणू सापडला का? वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False

Tags:    

Similar News