FACT CHECK: सुपरस्टार रजनीकांत यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला का?

Update: 2019-04-11 07:57 GMT

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली. अशातच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की, सुपरस्टार रजनीकांत यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

पोस्टमध्ये रजनीकांत आणि नरेंद्र मोदी यांचा मिठी मारतानाचा फोटो दिलेला आहे. सोबत कॅप्शन दिले की, सुपरस्टार रजनीकांत यांचा मोदीजींना जाहीर पाठींबा. कुठे आहे ते 600 कलाकार?

तथ्य पडताळणी

ही पोस्ट शेयर करणाऱ्या युजरने त्याच्या दाव्याला पुरावा म्हणून कमेंटमध्ये द इकोनॉमिक टाईम्सची बातमी दिली आहे. परंतु, 9 एप्रिल रोजीच्या या बातमीमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, रजनीकांत यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसल्याचे सांगत भाजपच्या जाहीरनाम्याची केवळ स्तुती केली.

मूळ बातमी येथे वाचा – द इकोनॉमिक टाईम्स

रिपब्लिक टीव्हीच्या वेबसाईटवरील बातमीत देखील रजनीकांत यांनी भाजपच्या जाहीरनाम्यात नदीजोड प्रकल्पाचा समावेश केल्याबद्दल केवळ स्तुती केली. त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा जाहीर केलेला नाही.

मूळ बातमी येथे वाचा – रिपब्लिक टीव्हीअर्काइव्ह

स्वराज्य मॅगझिनच्या वेबसाईटवरदेखील बातमीत म्हटले की, रजनीकांत यांनी मंगळवारी (9 एप्रिल) कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले. भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात नदी जोड प्रकल्पाचा मुद्दा समाविष्ट केलेला आहे. यासाठी रजनीकांत यांनी भाजपची स्तुती केली.

मूळ बातमी येथे वाचा – स्वराज्य मॅगझिनअर्काइव्ह

“दरबार” चित्रपटाच्या शुटींगसाठी मुंबईला जाण्यापूर्वी रजनीकांत यांनी चेन्नई येथील घरी मंगळवारी (9 एप्रिल) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला होता. याचा द इकोनॉमिक टाईम्सच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडियो उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

https://youtu.be/kbg-Sc9_Zzk

फॅक्ट क्रेसेंडोच्या तमिळ भाषिक सहकाऱ्याने केलेल्या अनुवादानुसार रजनीकांत म्हणाले की, भाजपने जाहीरनाम्यात म्हटल्याप्रमाणे देशभरातील नद्यांना जोडले तर शेतीला लाभ होऊन भारत एक संपन्न देश होईल. त्यातून नवीन रोजगार निर्माण होतील. कोणत्याही राजकीय पक्षाला माझा पाठिंबा नाही; पण भाजपचा जाहीरनामा कौतुकास्पद आहे.

पोस्टमध्ये दिलेला रजनीकांत-मोदींचा फोटोदेखील जुना आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी 13 एप्रिल 2014 रोजी मोदी चेन्नईला गेले होते. तेव्हा त्यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती. स्वतः मोदीं यांनी हा फोटो ट्विट केला होता.

https://twitter.com/narendramodi/status/455335882086547456

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, रजनीकांत यांनी केवळ भाजपच्या जाहीरनाम्याची स्तुती केली. त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:FACT CHECK: सुपरस्टार रजनीकांत यांनी नरेंद्र मोदींनी पाठिंबा जाहीर केला का?

Fact Check By: Mayur Deokar

Result: False

Similar News