रतन टाटांनी JNU विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरी न देण्याचा निर्णय घेतला का? वाचा सत्य

Update: 2020-02-24 10:18 GMT

टाटा ग्रुपचे माजी प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांना टाटा ग्रुपमध्ये नोकरीवर न घेण्याचा निर्णय घेतला, अशी धदांत खोटी पोस्ट सोशल मीडियावर फिरवली जात आहे. भारतविरोधी घोषणांचा आरोप आणि शुल्कवृद्धीनंतरच्या आंदोलनामुळे जेएनयू विद्यापीठ चर्चेत राहते. येथील विद्यार्थ्यांप्रती समाजमाध्यमांत समर्थक आणि विरोधक असे दोन गट आहेत. या पार्श्वभूमीवर रतन टाटांच्या नावे ही पोस्ट फिरतेय. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

रतन टाटांचा फोटो शेयर करून म्हटले की, रतन टाटांनी मोठी घोषणा केली आहे. टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये आता येथून पुढे जेएनयूतील विद्यार्थ्यांना नोकरी दिली जाणार नाही. जे विद्यार्थी देशाप्रती एकरुप राहू शकत नाहीत ते कंपनीशी काय बांधिलकी ठेवतील? (इंग्रजीतून भाषांतर)

पोस्टकर्त्याने लिहिले की, हा आदर्श सर्व राष्ट्राभिमानी कारखानदारांनी घ्यावा.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

रतन टाटा किंवा टाटा ग्रपुतर्फे अशी काही घोषणा किंवा निर्णय घेण्यात आला का याची माहिती घेतली. तेव्हा असे काहीच आढळले नाही.

अधिक सर्च केले असता इकोनॉमिक टाईम्स वेबसाईटवरील 15 फेब्रुवारी 2016 रोजीची बातमी आढळली. यानुसार, 2016 मध्ये जेव्हा कन्हैया कुमार प्रकरणावरून जेएनयू चर्चेत आले होते, त्यावेळी रतन टाटांच्या नावे हा मेसेज व्हायरल झाला होता. मेक इन इंडिया कार्यक्रमादरम्यान रतन टाटांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांना नोकरीवर घेणार नसल्याचे जाहीर केले होते, असा व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आला होता. यानंतर टाटा ग्रुपने हे खोटं असल्याचे सांगितले होते.

मूळ बातमी येथे वाचा – इकोनॉमिक टाईम्स

यानंतर टाटा कंपनीचे 15 फेब्रुवारी 2016 रोजीचे एक ट्विट आढळले. एक ट्विटर युजरने रतन टाटांच्या नावे करण्यात येणाऱ्या विधानासंबंधी टाटा कंपनीकडे विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना टाटा कंपनीच्या अधिकृत ट्वटिर अकाउंटवरून सांगण्यात आले की, रतन टाटांनी असे वक्तव्य केलेले नाही.

https://twitter.com/tatacompanies/status/699215324902608896

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, रतन टाटांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांना टाटा ग्रुपमध्ये नोकरी न देण्याची घोषणा केलेली नाही. त्यांच्या नावे हा खोटा मेसेज 2016 पासून फिरतोय. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नये.

रतन टाटांनी हॉटेल ताजच्या नुतनीकरणाचे टेंडर दोन पाकिस्तानी उद्योगपतींना देण्यास नकार दिला किंवा पाकिस्तान सरकारने टाटा सुमो खरेदी करण्याची दिलेली मोठी ऑर्डर रतन टाटांनी रद्द केली असे खोटे मेसेज व्हायरल होत असतात.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:रतन टाटांनी JNU विद्यापीठातील विद्यार्थ्यांना नोकरी न देण्याचा निर्णय घेतला का? वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False

Tags:    

Similar News