Fact Check : गृहमंत्रालयाने चिनी वस्तूंबाबत कोणताही अलर्ट जारी केलेला नाही

Update: 2019-08-22 13:26 GMT

? सावधान ? चीन तुमच्या आमच्या जीवाशी खेळतोय....! अशी माहिती असलेली Anant Samant यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. गृहमंत्रालयातील बिस्वजीत मुखर्जी या अधिकाऱ्याचे नाव या पोस्टमध्ये वापरण्यात आले आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानची स्वत:ची युध्द करण्याची क्षमता नसल्याने त्यांनी चीनची मदत मागितली आहे. चीनसुध्दा पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे. या फटाक्यांमध्ये विषारी द्रावण मिसळलेले आहे. हे फटाके वापरल्याने दम्यासारखे आजार होऊ शकतात. कृपया चीनने बनविलेल्या वस्तू आणि फटाके खरेदी करु नका. देशहितासाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. फॅक्ट क्रेसेंडोने गृहमंत्रालयाने खरोखरच कोणता अलर्ट जारी केला आहे का, याची तथ्य पडताळणी केली आहे.

Full View

फेसबुक / Archive

तथ्य पडताळणी

गृहमंत्रालयाच्या नावाने हा संदेश असल्याने आम्ही सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळास भेट दिली. त्याठिकाणी आम्हाला असा कोणताही संदेश दिसून आला नाही. या संदेशात बिस्वजीत मुखर्जी असे वरिष्ठ तपास अधिकाऱ्याचे नाव असल्याने ते देखील शोधण्याचा प्रयत्न केला. असे कोणते पद अथवा अधिकारी असल्याचे आमच्या निदर्शनास आले नाही.

गृह मंत्रालया द्वारे कोणतीही महत्वाची सुचना असल्यास ती या संकेतस्थळावर देण्यात येते. आम्हाला यासंदर्भातील कोणतीही सुचना या संकेतस्थळावर दिसून आली नाही. पत्र-सुचना कार्यालयाच्या संकेतस्थळावरही अशी कोणती सुचना आम्हाला दिसून आली नाही. त्यानंतर गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव कार्यालयाशी आम्ही संपर्क केला. गृहमंत्रालयाने स्पष्ट केली की, त्यांच्याकडे बिस्वजीत मुखर्जी नावाचे कोणीही कार्यरत नाही. त्यांच्याकडे वरिष्ठ तपास अधिकारी असे पदही नाही. यातून हे स्पष्ट होते की बिस्वजीत मुखर्जी नावाची कोणतीही व्यक्ती केंद्रीय गृहमंत्रालयात कार्यरत नाही. वरिष्ठ तपास अधिकारी असे पदही नाही. हा अलर्ट खोट्या नावाने आणि पदाच्या नावाने संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने पसरविण्यात येत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

निष्कर्ष

हा अलर्ट खोट्या नावाने आणि पदाच्या नावाने संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:Fact Check : गृहमंत्रालयाने चिनी वस्तूंबाबत कोणताही अलर्ट जारी केलेला नाही

Fact Check By: Ajinkya Khadse

Result: False

Tags:    

Similar News