वाराणसीत 100 पेक्षा अधिक जवान मोदींविरोधात लढणार का?

By :  amruta
Update: 2019-04-27 16:27 GMT

सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टच्या वृत्ताच्या शीर्षकात वाराणसीत शंभरहून अधिक जवानांचा नरेंद्र मोदी विरोधात लढण्याचा निर्धार असे म्हटले आहे. या पोस्टला 1 हजार 300 शेअर, 4 हजार 800 लाईक्स आणि 738 कमेंटस् मिळाल्या आहेत. या पोस्टच्या शीर्षकावरुन हे शंभर जवान मोदींविरोधात लढणार, असा समज निर्माण होत आहे. या पोस्टची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Full View

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

पोस्टमध्ये देण्यात आलेल्या वृत्ताचे शीर्षक वाराणसीत शंभरहून अधिक जवानांचा नरेंद्र मोदी विरोधात लढण्याचा निर्धार असे देण्यात आले आहे. लढणार म्हणजे नेमके काय करणार निवडणूक लढणार की प्रचार करणार असाही प्रश्न या शीर्षकामुळे निर्माण होत आहे.

दैनिक लोकसत्ताअर्काईव्ह

संपुर्ण वृत्त वाचल्यानंतर असे आढळून येते की, वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात 100 हून अधिक जवान लढणार नसून, प्रचार करणार आहेत.

याच बातमीतील दुसऱ्या पॅराग्राफमध्ये हे सर्व जवान जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहाद्दूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार असल्याचे स्पष्ट होते.

  • बातमी वाचल्यानंतर हे स्पष्ट होते की निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच्या जवानांनी पंतप्रधान मोदी विरोधात प्रचार करण्याचा निर्धार केला आहे.
  • हे सर्व जवान सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) निलंबित जवान तेज बहाद्दूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत.
  • वाराणसीमध्ये शंभरहून अधिक जवान नरेंद्र मोदी विरोधात निवडणूक लढणार नसून, निवृत्त लष्करी जवान मोदी विरोधात प्रचारासाठी तेज बहाद्दूर यांचे समर्थन करणार आहेत.

या संदर्भात दैनिक सकाळमध्येही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तामध्ये स्पष्टपणे शंभरहून अधिक जवान नरेंद्र मोदी विरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.

दैनिक सकाळअर्काईव्ह

थोडक्यात या संकेतस्थळानेही याबाबतचे वृत्त दिले आहे.

थोडक्यातअर्काईव्ह

टेलिग्राफचे मुळ वृत्तही आपण खाली वाचू शकता.

The Telegraph l अर्काईव्ह

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वाराणसीत शंभरहून अधिक जवानांचा नरेंद्र मोदी विरोधात लढण्याचा निर्धार या पोस्टचे शीर्षक चुकीचे आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:वाराणसीत 100 पेक्षा अधिक जवान मोदींविरोधात लढणार का?

Fact Check By: Amruta Kale

Result: False Headline

Similar News