एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाहतूक पोलिस एका तरुणाला मारहाण करताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ ठाणे शहराचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ ठाणे शहराचा नाही. ही घटना 8 महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती.

काय आहे दावा ?

या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिस अधिकारी एका तरुणाला चापट मारताना आणि लाथ मारताना दिसतात.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “गाडीचे पेपर्स, लायसन्स असेल नसेल तर कारवाई व्हायलाच पाहिजे पण नागरिकांना असे लाथाबुक्क्यांनी मारण्याचे 'लायसन्स' ट्रॅफिक पोलीसांना' दिलेय का...?”

या कॅप्शनसोबत हा व्हिडिओ ठाणे पोलीस आयुक्तालयाला टॅग केले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ ठाणे शहराचा नाही.

महाराष्ट्र टाइम्सने हाच व्हिडिओ 20 मे 2023 रोजी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये महिती देण्यात आली की, ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकमध्ये घडली होती. सिग्नल तोडल्यामुळे वाहतूक पोलिस अधिकरी व तरुणामध्ये शाब्दिक वाद झाला आणि नंतर वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. ज्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याने तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार एका नागरिकाने मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता.

https://youtu.be/6YEqF_tNCbE?si=a5J0IpagDScgLu2B

लोकमतच्या बातमीनुसार व्हिडिओमध्ये तरुणाला मारहाण करणारे वाहतून शाखेचे पोलिस कॉन्टेबल प्रदीप चव्हाण असून त्यांना मारण्यापासून न अडवता तरुणालाच समजूत देणारे कॉंन्स्टेबलचे नाव शहा होते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप कठाने यांनी या घटनेची प्रथमीक माहिती लोकमतला देताना सांगितले की, “त्या ठिकाणी तरूण दारू पिलेला होता. त्याला महावीर चौकाकडे जायचे होते. मात्र लाल सिग्नल लागल्याने तरुणाला तेथेच आपली गाडी थांबवावी लागली. ज्याचा त्याला राग आला आणि रागाच्या भरात वाहतूक पोलिसांकडे जाऊन वाद घालू लागला होता. ‘तुम्ही सिग्नला का बंद केले.’ अस म्हणत तरुण वाद हालत होता.”

मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

जेव्हा मिडवे टाइम्सने हा व्हिडिओ मुंबई पोलिसांना टॅग केले, तेव्हा मुंबई पोलिसांने स्पष्ट केले की, “व्हायरल व्हिडिओ मुंबईचा नसून छत्रपती संभाजीनगरचा आहे.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, ट्रॅफिक पोलिसाने तरूणाला मारहाण केल्याचा व्हायरल व्हिडिओ ठाणे शहराचा नाही. ही घटना 8 महिण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकामध्ये घडली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:छत्रपती संभाजीनगरमधील ट्रॅफिक पोलिसाने तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडिओ ठाण्याचा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Missing Context