महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कुंभे धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या अन्वी कामदारचा एका दरीत कोसळून मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर एक व्यक्ती दरीत पडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा अन्वीचा दरीत पडतानाचा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अन्वी कामदारशी संबंधित नाही. 2016 मध्ये हवाईमध्ये धबधब्यात पडलेल्या महिलेचा हा व्हिडिओ आहे.

काय आहे दावा ?

व्हिडिओमध्ये एक महिला दरी जवळ जात असताना तिचा अचानक पाय घसरतो आणि ती खाली पाण्यात पडून बुडताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर कराताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अन्वी कामदार असून ती मुंबईची रहिवासी होती. अन्वी रायगडमध्ये फिरायला गेली होती आणि रील बनवत असताना 300 फूट खोल खड्ड्यात पडून तिचा मृत्यू झाला.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, ही घटना 27 फेब्रुवारी 2016 मध्ये घडली होती.

सर्वप्रथम व्हायरलहॉग युट्यूब चॅनलवर या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आढळला. व्हिडिओमध्ये दिसते की, महिला पाय घसरून खाली पाण्यात पडते. पाण्यात पडल्यावर स्वता:ला सावरत किनाऱ्याजवळ येते आणि एक व्यक्ती तिला मदत करतो असे एकू येते.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हवाई धबधब्यावरून पडणे वेदनादायक.”

https://youtu.be/cuv_JtWu6rg?si=RE2bNkV-WkUAuJRl

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, या व्हिडिओमध्ये पाय घसरून पडलेल्या महिलेचे नाव हेदर फ्रिसन आहे. हेदर मित्रांसोबत हवाईमधील होनोलुलु शहरातील ‘काऊ क्रेटर ट्रेल’ला गिर्यारोहण करण्यासाठी गेली होती.

ती 50 फूट धबधब्यावरून खाली पडलेल्यावर तिच्या 10 फासळ्या तुटल्या आणि काही खोल जखमा झाल्या. तिला एअरलिफ्ट करून रुग्णालयात आल्यानंतर तिच्या बरगड्यांवर शस्त्रक्रिया करून बचावण्यात आले आणि आता ती स्वस्थ आहे. अधिक महिती आणि येथेयेथे वाचू शकता.

हेदरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 26 एप्रिल 2019 रोजी व्हायरल व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

https://www.instagram.com/p/Bws-R4Djbtd/?utm_source=ig_web_copy_link

ही घटना घडल्यानंतर हेदरने एका वर्षानंतर अर्थात 28 फेब्रुवारी 2017 रोजी आपला रुग्णालयातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

https://www.instagram.com/p/BRCQXPagqKS/?utm_source=ig_web_copy_link

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अन्वी कामदारचा दरीत पडतानाचा नाही. ही घटना 2016 मध्ये घडली असून पाय घसरून पडणाऱ्या महिलेचे नाव हेदर फ्रिसन आहे. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल व्हिडिओ अन्वी कामदारच्या मृत्युचा नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading