सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला विजेचा झटका बसला कारण तो मोबाईलमध्ये ब्लूटुथ चालू ठेऊन इअरफोन वापरत होता.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तीला विजेचा झटका मोबाईल किंवा हेडफोनने लागला नाही. तुटलेली विजेची तार त्या माणसाच्या डोक्यावर पडली होती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत असताना त्यापैकी एकाला अचानक विजेचा धक्का बसतो आणि तो रेल्वे ट्रॅकवर पडतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “रेल्वे स्थानकांवर ब्लूटूथ/वायरलेस बड्स वापरणे टाळा. नेट चालू असताना हाय-टेन्शन वीज कानातून मेंदूपर्यंत गेली.”

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार 8 डिसेंबर 2022 रोजी पश्चिम बंगालमधील खरगपूर रेल्वे स्टेशनवर टीटीई अधिकारी प्लॅटफॉर्मवर उभे असताना त्यांच्या डोक्याला हाय-व्होल्टेजची तुटलेली वायर पडली. या अपघातात भाजलेल्या अधिकाऱ्याचे नाव सुजान सिंग सरदार आहे. या घटनास्थळी असलेल्या रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी सुजान सिंगला त्वरीत रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचा जीव वाचला.

भारतीय रेल्वेचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अनंत रुपनगुडी यांनी हाच व्हिडिओ 8 डिसेंबर 2022 रोजी शेअर करत महिती दिली होती की, "काल दुपारी खरगपूर स्टेशनवर एक विचित्र घटना घडली, एका पक्ष्याने लांब केबलचा तुकडा घेतला होता. तो तुकडा ओएचई (OHE)वायरच्या संपर्कात आला आणि दुसरा टोक खाली असलेल्या (TTE) टीटीई अधिकाऱ्याच्या डोक्याला स्पर्श झाला. या अपघातात तो अधिकारी शॉक लागून भाजल्या गेला. परंतु, आता तो धोक्याबाहेर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे."

https://twitter.com/Ananth_IRAS/status/1600692866359054336?s=20

खरगपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक डीआरएम अधिकाऱ्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. कानात ब्लूटूथ इअरफोन किंवा वायरलेस बड्स असल्याने टीटीई अधिकारी सुजान सिंह यांना विजेचा झटका लागला नव्हता. हा अपघात 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारच्या सुमारास घडला होता. त्याच्या डोक्यावर हाय व्होल्टेज वायर पडल्याने ते जखमी झाला होते. परंतु, आता ते सुखरुप आहेत.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तीच्या कानात ब्लूटूथ इअरफोन किंवा इअरबड्स असल्याने नाही तर हाय व्होल्टेजची तार डोक्यावर पडल्याने विजेचा झटका लागला होता. आता तो धोक्याबाहेर असून सुखरुप आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल व्हिडिओमधील व्यक्तीला रेल्वे स्टेशनवर ब्लूटूथ इअरफोन वापरल्याने विजेचा झटका बसला का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Missing Context