सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये मनात धडकी भरणाऱ्या चार क्लिप्स आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओमधील सर्व क्लिप्स लहान मुलांच्या अपहरणाशी आणि त्यांच्या अवयवाच्या खरेदी – विक्रीशी संबंधित आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील क्लिप्स लहान मुलांच्या अपहरणाच्या नाहीत. तसेच पोलिस अधिकाऱ्याचा जनतेला सतर्क करण्याचा व्हिडिओ एडिटेड आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये चार क्लिप्स दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्या क्लिपमध्ये तोंडावर कपडा गुंडाळलेले काही लोक अपहरण केलेल्या लहान मुलांना खरेदी करताना दिसतात.

दुसऱ्या क्लिपमध्ये एक पोलिस अधिकारी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा उल्लेख करत सतर्क राहण्याचा इशारा देत असल्याचे दिसून येते.

तिसऱ्या क्लिपमध्ये जंगलातील एका लहान मुलाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आहे.

शेवटच्या क्लिपमध्ये एका जण जिवंत व्यक्तीची छाती चिरून त्याचे अवयव काढताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “तुमच्या कडे जेवढे ग्रुप असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा सर्व जागृत होऊदेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

खालील सर्व क्लिप्स रिव्हर्स मेज सर्च केल्यावर कळाले की, या क्लिप्स लहान मुलांच्या अपहरणाच्या नाहीत.

क्लिप क्र. 1

तोंडावर कपडा गुंडाळलेले काही लोक लहान मुलांचे अपहरण करतानाचा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे.

सचिन ठाकूर नामक युजरने 9 जुलै 2022 रोजी या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ अपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये 0:30 सेकंद आणि पुढे 1:33 मिनिटावर लिहिले आहे की, “हा व्हिडिओ सत्य घटनेवर आधारित नसून या ठिकाणी हे नाट्य अनुकरण आहे. तसेच हा व्हिडिओ जनजागृतीसाठी तयार करण्यात आला आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

क्लिप क्र. 2

यामध्ये पोलिस अधिकारी म्हणतात की, “आपल्या दारावर कुणी अज्ञात व्यक्ती आल्यास दार उघडू त्याच्यासोबत संवाद साधू नये. बरगडवामधून ( उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर शहरातील एक परिसर ) बातमी मिळाली आहे की, 500 लोक भिकारी बनून लोकांना मारून त्यांचे अवयव काढत आहेत. त्या मधील 5-6 लोकांना पकडण्यावर आरोपींनी ही माहिती सांगितली आहे.”

सत्य – हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. पोलिस अधिकाऱ्याने असे कोणतेही आवाहन केले नाही.

गोरखपूर न्यूज चॅनलने 25 ऑगस्ट 2019 रोजी आपल्या युट्यूब अकाउंटवर अपलोड केला होता. हाच व्हिडिओ एडिट करून चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

https://youtu.be/0oqeooxw6Hc?si=NtoDFgaf4hYO3pr4

या व्हिडिओमध्ये 0:08 ते 1:38 मिनिटा पर्यंत आपण पत्रकार गोरखपूर पोलिसांच्या नावाने व्हायरल झालेल्या फेक मेसेज वातानाचा पाहू शकतो.

मेसेच वाचून झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी व्हायरल होत असेलेला मेसेज खोटा असल्याचे सांगितले. शहरात मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्या आल्या नाहीत किंवा अशी कोणतीही घटना घडली नाही. गोरखपूरच्या नावाने खोटा मेसेज व्हायरल होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गोरखपूर पोलिसांनी 07 सप्टेंबर 2022 रोजी ट्विट करत व्हायरल मेसेजे खोटा असल्याचे सांगितले.

क्लिप क्र. 3

या ठिकाणी जंगलातील एका लहान मुलाचे विना अवयवाचे शरीराचा फोटो 2018 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

या फोटोसंबंधित अद्याप कोणतीही अधिकृत माहिती सध्यातरी आम्हाला मिळाली नाही. महिती मिळताच अपडेट करण्यात येईल.

क्लिप क्र. 4

यामध्ये आपण एका इमाला जिवंत व्यक्तीची छाती चिरून त्याचे अवयव काढतांना दिसते.

सत्य – हा व्हिडिओ भारताचा नाही.

मेक्सिकोच्या पॅसिफिक कोस्टवरील प्रमुख शहर अकापुल्कोजवळ 2018 मध्ये मेक्सिकन कार्टेलने दोन लोकांची कत्तल केली होती. त्यांनी एकाचे शिरच्छेद केले तर दुसऱ्याची छाती चिरून हृदय बाहेर काढले. अधिक माहिती आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील क्लिप्स लहान मुलांच्या अपहरणाचे नाहीत. पोलिस अधिकाऱ्याचा जनतेला सतर्क करण्याचा व्हिडिओ एडिटेड असून भ्रामक दाव्यासह पसरवला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:लहान मुलाच्या अपहरणाच्या अफवांसह असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading