काही दिवसांपूर्वी बिबट्याचे अनेक व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरच्या नावाने व्हायरल होत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

खालील सर्व व्हिडिओंची रिव्हर्स इमेज सर्च द्वारे पडताळणी केल्यावर कळाले की, हे व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरशी संबंधित नाही.

व्हिडिओ क्र, 1

या व्हिडिओमध्ये आपल्याला तीन बिबटे एका ठिकाणी दिसतात. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बिबट्या प्रताप नगर छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य – हा व्हिडिओ 14 मार्च रोजीचा असून हे बिबटे पुण्यातील जुन्नरमध्ये आढळले होते. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

व्हिडिओ क्र. 2

व्हायरल व्हिडिओमध्ये भिंतीवर एक बिबट्या चालताना दिसतो. युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “छत्रपति संभाजीनगर मध्ये सध्या बिबट्या घुसला आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य – हा बिबट्या जानेवारी महिन्यात हरियाणातील सोनीपत शहरात आढळला होता. अधिक महिती येथे वाचू शकता.

व्हिडिओ क्र. 3

व्हायरल व्हिडिओमध्ये एका घरातून वन अधिकारी बिबट्याला पायऱ्यांवरून खाली घेऊन जाताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिता की, युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अखेर बिबट्या पकडला! सिडको N-1 मध्ये सापडला तेही अलिशान एरीयात आणि अलिशान घरात.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य – हा व्हिडिओ नाशिकचा आहे. 19 नोव्हेंबर 2023 रोजी नाशिकमधील गोविंदनगर व सावतानगर परिसरातील घरामधून दोन बिबटे पकडण्यात आले होता. अधिक माहिती येथे वाचू शकता. तसेच संपूर्ण फॅक्ट-चेक येथे उपलब्ध आहे.

व्हिडिओ क्र. 3

या व्हिडिओमध्ये रस्त्यावर बिबट्या बसलेला आहे आणि त्याला पाहून अनेक वाहने माघारी फिरताना दिसतात.

युजर्स बिबट्याचा हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

सत्य – हा व्हिडिओ कर्नाटकमधील गडग जिल्ह्यातील बिनकडकट्टी गावातील आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 67 वर 16 एप्रिल 2023 रोजी रात्रीच्या वेळी हा बिबट्या ठाण मांडून बसला होता. अधिक माहिती येथे वाचू शकता. तसेच संपूर्ण फॅक्ट-चेक येथे उपलब्ध आहे.

या पुर्वीदेखील अशाच प्रकारे बिबट्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. फॅक्ट क्रेसेंडोने फॅक्ट-चेक केल्यावर कळाले की, ते व्हायरल व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहेत.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले बिबट्याचे व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरशी संबंधित नाही. भ्रामक दाव्यासह हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

Avatar

Title:छत्रपती संभाजीनगरच्या नावाने बिबट्याचे अनेक असंबंधित व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading