कुठल्याही गरजू विद्यार्थ्यांला पुस्तके किंवा गरीब घरातील मुलींच्या विवाहसाठी मेसेजमध्ये नमुद केलेल्या 24 नंबरांपैकी कोणत्याही नंबरा वर संपर्क केल्यावर लाडली फाउंडेशन आपली मदत करेल, या दाव्यासह अभिनेता आणि नाम फाउंडेशन सदस्य नाना पाटेकर यांचा नावाने हा मेसेज व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेज अनेक वर्षांपासून सोशन मीडियावर शेअर होत असून त्यामध्ये दिलेले नंबर बंद असून ते लाडली फाउंडेशनशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके आणि मुलींच्या विवाहमध्ये लागणारा खर्च व एक लाख रूपयांच्या घरवस्तू दिले जाईल असे लिहिले आहे. सोबत लाडली फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र कुमार यांच्या नावासोबत संपर्क करण्यासाठी 3 नंबर दिलेले आहेत. या मेसेजसोबत नाना पाटेकरांचे नाव जोडण्यात आले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल मेसेजमधील सर्व नंबरवर कॉल केल्यावर ते बंद असल्याचे आढळले.

अभिनेते नाना पाटेकर जसे नाम फाउंडेशन सदस्य आहेत, तसेच लाडली फाउंडेशनचे ही सदस्य आहे का ? याचा शोध घेतल्यावर कळाले की, नाना पाटेकर लाडली फाउंडेशनशी संबंधित नाही.

पुढे व्हायरल मेसेज संबंधित कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा मेसेज 2015 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

लाडली फाउंडेशनी 19 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर स्पष्ट केले की, व्हायरल होत असलेला मेसेज लाडली फाउंडेशन कडून जारी करण्यात आलेला नाही.

https://youtu.be/9FM9x68Y8Og?si=QilVT7nRNBnEs-jV

गरीब मुलींच्या लग्नासाठी लाडली फाउंडेशन 1 लाख रूपयाची आर्थिक मदत करणार, असा मेसेज परत व्हायरल झाल्यावर 11 एप्रिल 2023 फाउंडेशने ट्विट करता स्पष्ट केले की, व्हायरल मेसेज फेक आहे.

https://twitter.com/FoundationLadli/status/1645726258318417921

यापूर्वीदेखील लाडली फाउंडेशनच्या अधिकृत फेसबुक पेजवर 3 डिसेंबर 2015 रोजी एका पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यामध्ये अध्यक्ष देवेंद्र कुमार लिहिले होते की, “लाडली फाउंडेशनशी संबंधित संदेशाबद्दल मी सर्वांना सांगू इच्छितो की, आमचा संदेश बदल करून काही व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे चुकीच्या माहिती सह देशभरात शेअर केला जात आहे. ज्यामुळे आम्हाला देशभरातून मोठ्या संख्येने कॉल येत आहेत. सर्व कॉल्सना उत्तर देणे शक्य नसल्याने ते नंबर बंद करण्यात आले आहेत. पुढील कार्यक्रमाची माहिती फाउंडेशनच्या फेसबुकवर टाकण्यात येईल आहे. लाडली फाउंडेशन संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी सर्वांनी संस्थेच्या फेसबुक पेजवर सहभागी व्हावे ही विनंती.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

यापूर्वीदेखील लाडली फाउंडेशनच्या नावाने एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामध्ये फाउंडेशनच्या नावावर प्रोसेसिंग फी 5,999 रुपये आकारण्यात येणार आहे.

लाडली फाउंडेशने आपल्या युट्यूब चॅनलवर 28 डिसेंबर 2023 रोजी व्हिडिओ शेअर करत सांगितले की, व्हायरल पत्रक फेक असून अशा कोणत्याही प्रकारचे शुल्क फाउंडेशन आकारत नाही.

मूळ पोस्ट – लिंक्डइन | आर्काइव्ह

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने लाडली फाउंडेशनचे सदस्य राजवीर सिंह यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांना सांगितले की, “लाडली फाउंडेशन गरीब मुलींचे सामोहिक लग्न लावून देते व तसेच वधू – वराला एक लाख पर्यंत मुल्या असलेल्या भावी आयुष्याला कामाला येणाऱ्या अवश्यक वस्तू भेट स्वरूपात दिल्या जातात. विवाह नोंदनीसाठी कुठलाही शुल्क आकारण्यात येत नाही.” संपर्क क्रमांक आपण येथे पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, लाडली फाउंडेशन गरजू विद्यार्थ्यांची आणि गरीब घरातील मुलींच्या विवाहसाठी मदत करते. परंतु, मेसेजमध्ये दिलेले नंबर लाडली फाउंडेशनशी संबंधित नाही. भ्रामक दाव्यासह वर्षानुवर्ष हा मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:लाडली फाउंडेशनच्या नावाने फेक नंबरांचा मेसेज व्हायरल; वाचा सत्य

Written By: Agastya Deokar

Result: Misleading