पॅलेस्टाइनमध्ये हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये छेड काढणाऱ्या काही पुरुषांना तीन महिला चांगला चोप देतात. या व्हिडिओसोबत दावा केला जात आहे की, इस्रायलमध्ये अशा प्रकारे दंगेखोरांना तेथील महिला चोख उत्तर देतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओ इस्रायलमधील नाही. तसेच हा व्हिडिओ केवळ नाट्यसादरीकरण होते.

काय आहे दावा ?

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “तीन इस्रायली मुलीनी दंगल खोराना चांगलेच फटके दिले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ इस्रायलमधील नाही.

कॅम्पस युनिव्हर्स कॅस्केड्स या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ आढळला. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘रस्त्यावरील लढाई.’

https://www.instagram.com/reel/CzJmfNctV1o/?utm_source=ig_web_copy_link

पुढे कॅम्पस युनिव्हर्स कॅस्केड्स बद्दल अधिक सर्च केल्यावर कळाले की, ही फ्रान्समधील एक संस्था असून 2008 पासून चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात स्टंट करण्यासाठी कलाकारांना प्रशिक्षिण देण्याचे काम करते.

मूळ पोस्ट – कॅम्पस युनिव्हर्स कॅस्केड्स

बीबीसी पत्रकार शायन सरदारिजाबेह यांनी स्पष्ट केले की, “व्हायरल व्हिडिओ स्टंट करणाऱ्या कलाकारांना प्रशिक्षण देणारी फ्रान्समधील शाळा कॅम्पस युनिव्हर्स कॅस्केड्सने (CUC) इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला प्रचारात्मक व्हिडिओ आहे.”

https://twitter.com/Shayan86/status/1724840226550350235?s=20

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने कॅम्पस युनिव्हर्स कॅस्केड्स या प्रशिक्षण शाळेच संस्थापक लुकस डॉलफस यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांनी स्पष्ट केले की, “हा व्हिडिओ “रस्त्यावरील लढाई” या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षणचा एक भाग म्हणून आमच्या विद्यार्थ्यांसह तयार करण्यात आला होता. परंतु, हा फक्त एक स्टंट असून सर्व काही पूर्वनियोजित आणि कोरिओग्राफ केलेले होते.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. स्टंट करण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या कॅम्पस युनिव्हर्स कॅस्केड्स या संस्थेने हा व्हिडिओ तयार केला होता. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:इस्रायली महिलांनी दंगेखोरांना मारण्याचा तो व्हिडिओ ‘स्क्रिप्टेड’; वाचा त्यामागील सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading