भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते संसदेत बोलताना संविधानात किती पाने आहेत? असे विचारतात. 

दावा केला जात आहे की, खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींना संविधानावर प्रश्न विचारल्यावर ते निशब्द झाले.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. अनुराग ठाकूर यांनी संविधानवर प्रश्न विचाला तेव्हा राहुल गांधी संसदेत नव्हते.

काय आहे दावा ?

व्हायरल क्लिपमध्ये अनुराग ठाकूर संविधानमध्ये किती पाने असतात ? असा प्रश्न विचारतात.

तसेच क्लिपच्या दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नेते दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “संविधानात किती पाने आहेत हे राहुल गांधी सांगू शकला नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या क्लिप जोडण्यात आले आहे.

संसद टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलवर अनुराग ठाकूरचा संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ 1 जुलै रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “अनुराग ठाकूर यांचे वक्तव्य 18व्या लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव.”

https://youtu.be/Zi33ZH-mEok?si=yXIhiky3lrFqkm-g&t=3390

अनुराग ठाकूर 56:30 मिनिटावर म्हणतात की, "मला तुम्हा सर्वांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की, संविधानात किती पाने आहेत?" यानंतर ते म्हणतात, की "तुम्ही ते रोज फिरवत असाल तर ते उघडून वाचा तरी."

अनुराग ठाकूर यांनी हा प्रश्न विचारल्यावर कॅमेरा विरोधी बाकाकडे वळला, मात्र राहुल गांधी तेथे दिसत नाहीत.

व्हिडिओच्या सुरुवातीला अनुराग ठाकूर यांचे भाषण सुरु होण्याआधी 00:25 सेकंदावर राहुल गांधी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर नीटवर (NEET) चर्चेसाठी एक दिवस निश्चित करण्यात यावा असे सुचवतात.

पुढे अनुराग ठाकूर यांच्या भाषणादरम्यान, व्हिडिओमध्ये विरोधी पक्षनेते 3 मिनिटे 16 सेकंदांनी सभागृहातून बाहेर पडतात. काही काळानंतर सर्व विरोधी खासदार पुन्हा सभागृहात दिसतात. मात्र त्यामध्ये राहुल गांधी नाहीत.

तसेच अनुराग ठाकूर यांनी 56:30 मिनिटांवर विरोधकांना संविधानाच्या पानांबाबत प्रश्न केल्यावर 56:48 मिनिटावर कॅमेरा विरोधी बाकाकडे फिरतो तेव्हा कळते की, प्रश्न विचारल्या गेल्यावर राहुल गांधी सभागृहात नव्हते.

अर्थात व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला असून दोन वेगवेगळ्या क्लिपला जोडून संभ्रम निर्माण केला जात आहे.

राहुल गांधी

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, राहुल गांधी यांची व्हायरल व्हिडिओमधील क्लिप 18 व्या लोकसभात ‘राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभारप्रदर्शन’ करतानाच्या भाषणाची आहे.

या संपूर्ण भाषणाच्या व्हिडिओमध्ये 19:03 ते 19:08 मिनिटावर राहुल गांधी उभे असल्याची क्लिप पाहता येते.

https://youtu.be/Ke2qgnkhfMM?si=3iIRL38Bjjf5EziI&t=1141

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, दोन वेगवेगळ्या क्लिप एकत्र जोडून चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

https://youtu.be/QKp8SIByIo0?si=dPbHYbnzwxjH4xLp

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड आहे. मूळ व्हिडिओमध्ये जेव्हा अनुराग ठाकूर यांनी संविधानवर प्रश्न विचारला तेव्हा राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधींना संविधानात किती पाने आहेत माहित नाही का? एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Altered