सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक पुतळा जाळतात परंतु, ते करत असताना त्यांच्याच लुंगीला आग लागते. दावा केला जात आहे की, तामिळनाडुमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा जाळत असतांना त्यांच्याच लुंगीला आग लागली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ पंतप्रधान मोदींशी संबंधित नाही. 12 वर्षांपूर्वी केरळमधील कोची शहरातील एमजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात केरळ विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे दहन केले होते.

काय आहे दावा ?

पुतळा जाळतानाचा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “तामिळनाडूमध्ये मोदीजींच्या पुतळ्याचे दहन करताना पाच DMK नेत्यांच्या लुंगीला आग लागली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2012 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

एशियानेट न्यूजने 5 जुलै 2012 रोजी युट्यूबवर हाच व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओसोबत महिती दिली आहे की, “एमजी विद्यापीठाच्या कुलगुरूंविरोधात ‘केरळ विद्यार्थी संघा’चे (केएसयू) कार्यकर्ते आंदोलन करत होते. त्यावेळी कुलगुरूंच्या पुतळ्याचे दहन करताना काही कार्यकर्त्यांच्या लुंगीला आग लागली होती.”

https://youtu.be/wp6TyK27SyQ?si=-MvP3nexSTdiNSGs&t=14

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हिडिओमध्ये दिसणारा झेंडा आणि केएसयू संघाच्या झेंडा एकच आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने 24 जुलै 2012 रोजी प्रकाशीत केलेल्या बातमीनुसार “व्हिडिओमध्ये दिसणारे विद्यार्थी केरळमधील कोची शहरातील एमजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करत होते. कुलगुरूंचा पुतळा जाळताना जखमी झालेल्या आंदोलकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.” अधिक माहिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओ पंतप्रधान मोदींशी संबंधत नाही. 12 वर्षांपूर्वी केरळमधील कोची शहरातील एमजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात केरळ विद्यार्थी संघाच्या कार्यकर्त्यांनी या पुतळ्याचे दहन केले होते. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:तामिळनाडुमध्ये पंतप्रधान मोदींचा पुतळा जाळताना द्रमुकच्या कार्यकर्त्यांच्याच लुंगी आग लागली का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading