विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनाचा फटका बसलेल्यानंतर ग्रामस्थांशी खासदार शाहू महाराज आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी संवाद साधला होता.

या पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही महिलांसमोर खासदार शाहू महाराज यांना कान पकडताना दिसतात.

दावा केला जात आहे की, खासदार शाहू महाराज विशाळगडावरील अतिक्रमण आंदोलनात नुकसान झालेल्या लोकांची माफी मागितली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा भ्रामक आहे. खासदार शाहू महाराज महिलाच्या कानातील चोरी झालेल्या सोन्याबद्दल बोलत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये शाहू महाराज महिलांसमोर कान पकडताना दिसतात.

युजर्स हा फोटेशेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “विशाळगडावरील मुसलमानांची कान धरून माफी मागताना खासदार शाहू छत्रपती.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमध्ये खासदार शाहू महाराजांनी माफी मागत नव्हते.

मुंबई तकने शाहू महाराजांनी विशाळगडवरील हिंसेनंतर ग्रामस्थांशी घेतलेल्या भेटीचा व्हिडिओ 16 जुलै रोजी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये आपण महिला त्यांच्या व्यथा शाहू महाराजांना सांगताना पाहू शकतो. तसेच आजू बाजूला जास्त आवाज होत असल्याने स्पष्ट ऐकू येत नव्हते.

व्हिडिओमध्ये 1:37 एक महिला त्यांना सांगते की, एका अज्ञाताने तिचे दागिने हिसकावले. स्पष्ट ऐकू येत नसल्याने शाहू महाराजांनी कानाला हात लाऊन विचारले की, “दागिने हिसकावले ?”

पुढे त्यांनी बाजूला उभे असलेल्या आमदार सतेज पाटील यांना हावभाव करून ‘महिलाचे दागिने हिसकावल्याचे’ सांगितले.

https://youtu.be/qhNtGVxqYtg?si=CpJI-3I_qzsVUAUB&t=97

एबीपी माझाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ 18 जुलै 2024 रोजी शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये महिला शाहू महाराजांकडे हल्लेखोरांची तक्रार करताना सांगतात की, “अज्ञात हल्ले खोरांनी आमचे दागिने हिसकावले.” यावेळी त्यांच्याशी बोलताना ते कानावर हात लागतांना दिसतात.

https://www.instagram.com/reel/C9j08bvCDgU/?utm_source=ig_web_copy_link

विशाळगड दौरा

विशाळगड अतिक्रमण मुक्त आंदोलनावेळी हे हिंसक वळण विशाळगड तसेच पायथ्याशी असलेल्या गजापूर, मुसलमानवाडी या गावांना फटका बसला होता. तेथील घरे, दुकाने, वाहने यांची नासधूस, जाळपोळ, मारहाण करण्यात आली होती.

दंगलीचा फटका बसलेल्या ग्रामस्थांशी 16 जुलै रोजी खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांनी संवाद साधला. अधिक माहिती आपण येथेयेथे वाचू शकतो.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये शाहू महाराज माफी मागत नव्हते. ते विशाळगडावरील आंदोलनाचा फटका बसलेल्या ग्रामस्थांशी बोलत होते. खोट्या दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:खासदार शाहू महाराज यांनी खरंच कान धरून माफी मागितली का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading