एका व्हिडिओसह दावा केला जात आहे की, आयसीआयसीआय बँकेत ग्राहकांना बंद प्लास्टिक आवरणात खोट्या नोटांचे बंडल देण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडाताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील नोटा आयसीआयसीआय बँकेतील नाहीत.

काय आहे दावा ?

चार मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एक महिला बंद प्लास्टिक आवरणातून नोटांचे बंडल काढते. यामध्ये फक्त एक 500 रुपयेची खरी नोट आणि बाकी सगळ्या कोऱ्या नोटा दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बँकेतून कॅश घेताना बंडल कॅशियर कडून फोडून घ्या आता.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओची दखल घेत आयसीआयसीआय बँकने स्पष्ट केले की, व्हिडिओमध्ये दाखवलेले फेक नोटांचे बंडल आयसीआयसीआय बँकेतील नाहीत.

देवेंद्र शेखर नामक ट्विटर युजरने 25 ऑगस्ट रोजी आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत अकाउंटला याच व्हिडिओमध्ये टॅग केले होते.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, कोणत्याही बँकेतून सीलबंद बंडल घेऊन जाऊ नका. बँकेला ते उघडून तुम्हाला द्यायला सांगा. मोठा घोटाळा सुरू आहे. एकदा निघून गेल्यावर कोणी ऐकणार नाही. (भाषांतर)

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

या व्हिडिओची दखल घेत आयसीआयसीआय बँकने ट्विट द्वारे करत सांगितले की, “हा व्हिडिओ जुना असून यामध्ये दर्शविलेले रोख बंडल आयसीआयसीआय बँकेने दिलेले नाहीत. आमच्या करन्सी चेस्टद्वारे जारी केलेल्या रोख बंडलमध्ये वेगळ्या रंगाचे आवरण असते व ते प्लास्टिक आवरण नसते. अज्ञात व्यक्तीने आमचा लोगो आणि ब्रँड नाव वापरून हा व्हिडिओ तयार केलेला आहे.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोने आयसीआयसीआय बँकेमधील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यावर त्यांनी माहिती दिली की, “व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आयसीआयसीआय बँकेत नोटांचे बंडल प्लास्टिकमध्ये बांधले जात नाही. तसेच आयसीआयसीआय बँकमध्ये नोटांवर पिवळ्या रंगाची चिट असते. हा व्हिडिओ बनावट असून त्यामध्ये दाखलेले फेक नेटांचे बंडल आयसीआयसीआय द्वारे ग्राहकांना देण्यात आले नाही.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील नोटांचे बंडल आयसीआयसीआय बँक कडून ग्राहकांना देण्यात आलेले नव्हते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:फेक नोटांचे बंडल आयसीआयसीआय बँकेशी संबंधित नाही; खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False