साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात पानाचा रस टाकल्यास वाचतो जीव; सत्य की असत्य

Update: 2019-02-16 14:07 GMT

भारतात छोटया मोठया मिळून सापाच्या जवळपास 550 प्रजाती आहेत. यातील केवळ 10 प्रजाती अतिविषारी आहेत. या विषाने कोणाचाही जीव जाऊ शकतो. अन्य प्रजाती इतक्या विषारी नसतात. अनेकांचा जीव हा साप चावल्याच्या भीतीने जात असतो. साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात काही पानांचा रस टाकल्यास जीव वाचतो असे इनसॉरट मराठी या संकेतस्थळाने म्हटले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इनसॉरट मराठी / आक्राईव्ह लिंक

फेसबुकवर व्हीआयपी मराठी डॉट कॉम या पेजवर या पोस्टला 1 हजार लाईक्स आहेत. तर 474 जणांनी ही बातमी शेअर केली आहे.

Full View

अक्राईव्ह लिंक

मराठी चुटकूले या फेसबुक पेजवर या बातमीला एक हजार 100 लाईक्स आहेत. तर 313 जणांनी ही बातमी शेअर केली आहे.

Full View

अक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

साप चावल्यावर काही अनेक उपाय आहेत जे केले जातात. यात द्रोणपुष्पी (वैज्ञानिक नाव: Leucas cephalotes) मोरपीस (वैज्ञानिक नाव: peacock feather) गुळवेल (वैज्ञानिक नाव: Tinospora cordifolia) चा उपयोग सर्पदंशावरील केला जातो, असे इनसॉरट मराठीने म्हटले आहे.

दैनिक दिव्य मराठीने गुळवेलच्या उपयोगाविषयी दिलेली माहिती सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

दिव्य मराठी / आक्राईव्ह लिंक

दैनिक प्रभातनेही गुळवेलच्या उपयोगाविषयी माहिती दिली आहे. या माहितीतही गुळवेलचा उपयोग सर्पदंशावर करता येत असल्याचा उल्लेख आढळलेला नाही.

दैनिक प्रभातमध्ये गुळवेलवर असलेली माहिती सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

दैनिक प्रभात आक्राईव्ह लिंक

खाली दिलेल्या लिंकवर सर्पदंशावर काय उपाय करता येऊ शकतात याची माहिती देण्यात आली आहे. Traditional Use of Plants Against Snakebite in Indian Subcontinent

दैनिक भास्करने द्रोणपुष्पीचा उपयोग सर्पदंशावर होऊ शकतो, असे म्हटले आहे. खाली देण्यात आलेल्या लिंकवर तुम्ही हा व्हिडीओ पाहू शकता

दैनिक भास्कर

आक्राईव्ह लिंक

आम्ही यासंदर्भात मागील 16 वर्षांपासून आयुर्वेदीक उपचार करणारे डॉ. अनिल वर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, अशा स्वरुपाच्या उपचारांचा मर्यादितच उपयोग असतो. त्यामुळे यावर डॉक्टरांकडूनच योग्य उपचार करणे गरजेचे आहे. हा साप कोणत्या प्रकारचा हे सांगावे तसे सांगता येत नसल्यास त्यांचा रंग आणि वर्णन डॉक्टरांना सांगितल्यास तो विषारी होता की विनविषारी हे समजू शकते.

निष्कर्ष

वनस्पती आणि उपचारांचा फायदा होत असला तरी तो अंतिम उपाय नाही. या उपचारांविषयी वैद्यकीय जगतातच दुमत असल्याने हे उपचार करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणेही गरजचे आहे. साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात काही पानांचा रस टाकल्यास वाचतो जीव ही माहिती संभ्रम निर्माण करणारी आहे.

Title: साप चावल्यावर एक तासाच्या आत तोंडात पानाचा रस टाकल्यास वाचतो जीव; सत्य की असत्य
Fact Check By: Dattatray Gholap
Result: Mixture (संभ्रमित करणारी माहिती)

Similar News