शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून पंतप्रधानांच्या हस्ते हसत हसत रेल्वेचे उद्घाटन; सत्य की असत्य

Update: 2019-02-16 11:24 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्वात जलद ट्रेन समजल्या जाणार्‍या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हसत हसत हे उद्घाटन केले आणि अधिका-यांशी हसत हसत गप्पा मारल्या, असे वृत्त दैनिक नवाकाळने दिले आहे.

दैनिक नवाकाळचे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

दैनिक नवाकाळ / आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

या घटनेतील नेमकं तथ्य काय आहे हे जाणून घेण्याचा फॅक्ट क्रिसेडोने प्रयत्न केला आहे.

बिझनेस स्टॅन्डर्ड या वृत्तपत्राने याबाबतचा एक व्हिडीओ युटयूबवर अपलोड केला आहे. या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंचित स्मित हास्य करताना दिसत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=Bec3Pwv3-H0

आक्राईव्ह लिंक

द प्रिंटनंही वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाचे वृत्त दिले आहे. द प्रिंटनं या वृत्तासोबत 5 छायाचित्रं दिली आहेत. यातील चार फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. यातील एका छायाचित्रात नरेंद्र मोदी स्मित हास्य करताना दिसत आहेत. कोणत्याही छायाचित्रात ते अधिका-यांशी हसत हसत बोलताना दिसत नाहीत.

द प्रिंटनं दिलेले वृत्त सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

द प्रिंट / आक्राईव्ह लिंक

इंडिया टूडेनंही वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या वृत्तात कुठंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हसत हसत या रेल्वेचे उद्घाटन केल्याचा उल्लेख केलेला नाही. या वृत्तासाठी वापरलेले छायाचित्रही केवळ रेल्वेचे आहे. त्यामुळं त्यांनी हसत हसत अधिका-यांशी गप्पा मारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठेही दिसत नाहीत.

इंडिया टूडेने दिलेले वृत्त सविस्तरपणे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

इंडिया टूडे / आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाच्या वेळी केवळ स्मित हास्य केले आहे. पंतप्रधानांनी अधिका-यांशी हसत हसत गप्पा मारल्याचेही कुठेही दिसून येत नाही. पंतप्रधान अनेक ठिकाणी गंभीर दिसत आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत हे वृत्त संभ्रमित करणारे असल्याचे दिसून आले आहे.

Title: शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून पंतप्रधानांच्या हस्ते हसत हसत उद्घाटन
Fact Check By: Dattatray Gholap
Result: Mixture (संभ्रमित करणारी माहिती)

Similar News