राजस्थानमधील एका शेतकर्‍याला दोरीने बांधले, कैद केले आणि सार्वजनिकरित्या मारण्यात आले - खोटे किंवा खरे?

Update: 2018-06-06 09:46 GMT

मजकूर संदेशासह हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला गेलेला आहे, विशेषतः फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्वीटरवर. तर या बातमीमागील सत्य काय आहे?

'भक्तों का बाप रविश कुमार' नावाच्या एका पेजने सुद्धा 30 मे रोजी त्याच्या 1 लाख फॉलोवर्ससोबत ही पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट 1, 000 हून अधिक वेळा शेअर केली गेली होती. 'हरियाणा की बात' नावाचे आणखी एक फेसबुक पेज ज्याचे सुमारे 1 लाख फॉलोवर्स आहेत त्याने देखील ही इमेज प्रसारित केली होती.

ही पोस्ट ट्विटरवर देखील "राजस्थानमधील एका शेतकर्‍याला 1,000 रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या त्याच्या असमर्थतेसाठी पोलिसांद्वारे दोरीने बांधण्यात आले, कैद करण्यात आले आणि सर्वांसमोर मारण्यात आले. न्याय कुठे आहे?" या शीर्षकासह शेअर केली गेली:

येथे याचे एक उदाहरण पहा

गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्चनुसार, या व्हायरल इमेजमधील घटना 10 एप्रिल 2016 ची आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या लेखानुसार, राजकोटमध्ये आपल्याच सुनेवर बलात्कार करण्याचा आरोप असणार्‍या एका व्यक्तीस पोलिस निरीक्षक सार्वजनिकरित्या अपमानित करतो आणि मारहाण करतो.  'सरभरा' म्हटल्या जाणार्‍या सार्वजनिकरित्या शरमिंदा करण्याच्या प्रथेचा आनंद घेणे शहर पोलिसांनी सुरू ठेवले.

हे चित्र शेअर केले जात आहे आणि त्यावर आधारित वेगवेगळे खोटे वृत्तांत सोशल मीडियावर दिले जात आहेत.

हिंदुस्तान टाईम्सच्या अधिकृत फेसबुक पेजने चित्राच्या मागील खरी कथा पुढे आणली. येथे बघा…

तसेच वेगवेगळ्या तथ्य तपासणी (फॅक्ट चेकिंग) वेबसाईट्सने देखील ही एक बनावट बातमी असल्याचे निश्चित केले. कृपया पहाः

अयुप|. अल्टन्यूज

या व्हायरल इमेजमधील घटना 10 एप्रिल 2016 ची आहे आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांद्वारे या इमेजचा वापर केला जात आहे

Similar News