तथ्याची पडताळणी: टॅक्सी विकून चालकाने वाचवले अनोळखी युवतीचे प्राण!

Update: 2019-02-12 13:42 GMT

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एका अपघातग्रस्त युवतीचे टॅक्सी विकून चालकाने प्राण वाचविल्याची घटना घडली आहे. राजवीऱ असे या युवतीचे प्राण वाचविणा-या टॅक्सीचालकाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तर युवतीचे नाव असीमा असल्याचे सांगण्यात येतंय.

Nmjweb
आर्काइव्ह लिंक

ही बातमी 8 फेब्रुवारी 2019 रोजी या वेबसाईटने प्रसिध्द केली होती. ही पोस्ट फेसबुकवरुन सुमारे 13 हजार जणांनी ही बातमी शेअर केली आहे. ही बातमी युटयूबवरील काही चॅनलवर मागील वर्षापासून चालविण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=gCnHcqTFXwU

https://liveindia.live/txzx/

liveindia
आर्काइव्ह लिंक

तथ्याची पडताळणी

या बातमीत दाखविण्यात आलेल्या छायाचित्रातून हे दिसून येत आहे की, टॅक्सीवाल्याचे हे छायाचित्र मुंबईतील आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील हे छायाचित्र नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यातील युवतीचे छायाचित्रही वेगवेगळ्या नावाने विविध संकेतस्थळावर दिसून येत आहे. गुगल रिव्हर्स इमेजद्वारे शोध घेतला असतानाही ही बाब समोर आली.

हीच बातमी वेगवेगळ्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या पध्दतीने मांडण्यात आली आहे.

निष्कर्ष:
या बातमीत दाखविण्यात आलेली छायाचित्र ही सहारनपूरमधील नसून मुंबईतील आहेत. तसेच ही घटना नेमकी कधी घडली याचा उल्लेख आढळत नाहीत. राष्ट्रपतींचा उल्लेखही अपूर्णच आहे. टॅक्सी चालकाचे आणि युवतीचे नावही वेगवेगळ्या संकेतस्थळावर वेगवेगळे आहे. त्यामुळे आम्ही ही बातमी खोटी असल्याचे म्हटलंय.

Title: तथ्याची पडताळणी: टॅक्सी विकून चालकाने वाचवले अनोळखी युवतीचे प्राण!"
Fact Check By: Dattatray Gholap
Result: False


Similar News