तथ्य तपासणी: ओरल पोलिओ वॅक्सिन (लस) (ओपीव्ही) संसर्गित होणे

Update: 2019-01-17 06:20 GMT

अलीकडेच, भारतातील पालकांमध्ये व्हॉट्सअॅप आणि सोशल मिडीयाच्या काही मॅसेजनी दहशत निर्माण केली आहे. हे मॅसेज दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगून पालकांच्या भीतीसोबत खेळत आहेत.

सोशल मिडियावरील गोष्ट:

"5 वर्षांखालील मुलांना पोलिओचे थेंब देऊ नका"

इतर मॅसेजेस जसे कि:

किंवा

धिरज गडीकोटा @धिरजगडीकोटा

टीव्ही वरील न्यूज मध्ये सांगण्यात आले आहे कि, उद्या 5 वर्षापर्यंत च्या मुलांना पोलिओ डोस देऊ नका कारण त्यामध्ये काही व्हायरस सापडले आहेत, आणि हे निर्माण करणाऱ्या कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

कुटुंबातील सर्वाना तसेच ज्यांना मुले आहेत त्यांना हे सूचित करा. ओरल पोलिओ देऊ नका.

वाचक सुद्धा येथे तेच ट्वीट बघू शकतात: http://archive.is/hLLUb

अशा प्रकारचे मॅसेज लोकांना गोंधळात टाकतात आणि भयभीत करतात. या मॅसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी ट्विटर वापरकर्त्यांनी विविध मिडिया स्त्रोतांमधून मॅसेज वितरित करण्यास सुरु केली आहे. काही मॅसेजेस खाली आहेत:

✔@अनुभू

अलीकडील पोलिओ लस विवादानंतर भारत अद्याप "पोलिओ मुक्त" असेल का? https://thewire.in/health/explainer-how-bad-is-the-polio-vaccine-contamination-controversy …

स्पष्टीकरणः 'पोलिओ लस संसर्ग' हा वाद किती वाईट आहे?

अलार्म आवश्यक आहे - ज्या मुलांना लस देण्यात आली होती त्या शंभर पैकी दोन मुलांच्या विष्ठे मध्ये व्हायरस चे नमुने आढळले. भारत अद्याप 'पोलिओ मुक्त' मानला जाईल का?

✔@अनुभू

Q: तर, मुले #पोलिओ होण्याच्या जोखीमेतून स्पष्टपणे बाहेर आहेत का?

A: नाही. फक्त पुढील 5 ते 6 महिन्यापर्यंतच माहिती आहे. कारण पोलिओ शो अप करण्यासाठी तेवढा वेळ घेतो. .https://thewire.in/health/explainer-how-bad-is-the-polio-vaccine-contamination-controversy …

स्पष्टीकरणः 'पोलिओ लस संसर्ग' हा वाद किती वाईट आहे?

अलार्म आवश्यक आहे - ज्या मुलांना लस देण्यात आली होती त्या शंभर पैकी दोन मुलांच्या विष्ठे मध्ये व्हायरस चे नमुने आढळले. भारत अद्याप 'पोलिओ मुक्त' मानला जाईल का?

✔ @ दहिंदूसायन्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने #उत्तरप्रदेश #महाराष्ट्र आणि #तेलंगानातील टीकाकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हायल्स मध्ये सापडलेल्या टाईप-2 #पोलिओ #व्हायरस च्या संसर्गतेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत आणि तीन राज्यांमध्ये अतिरिक्त टीकाकरण करण्याचे आदेश दिले आहेत. http://bit.ly/2O3Obuw

केंद्राने टाईप-2 पोलिओ व्हायरस संसर्गित होण्याची चौकशी सुरू केली

टाईप -2 चा घातक पोलिओ व्हायरस मुळे शेवटचे प्रकरण 1999 मध्ये अलीगड येथे जागतिक स्तरावर नोंदवल्या गेले.

✔ @ एमइक्बालखान

इतर सर्व गोष्टी सोडून, आपण आता या विषयी चिंता करायला पाहिजे. लस मध्ये पोलिओ व्हायरस आहे का? म्हणजे खरोखरच का? जो कुणी यासाठी जबाबदार असेल तो खरोखरच दहशतवादी आहे आणि त्याला फाशी दिली पाहिजे. #पोलिओ #व्हायरस #लिकझाला ? ब्लडी हेल

https://twitter.com/twitter/statuses/1047510764771192832

✔ @मिररनाऊ

@फेडिसुझा:आम्ही हेल्थकेअर सोबत डील करू आणि ते प्राईमटाईम मध्ये ठेवू कारण अनेक गोष्टी चुकीच्या होत आहेत. हेल्थकेअर मनामध्ये सर्वात आधी असले पाहिजे! #पोलिओ

आमची तथ्य तपासणी:

फॅक्टक्रिसेंडो टीम ने या समस्येवर तथ्य तपासले. आम्हाला खालील आढळून आले:

व्हॉट्सअॅप मॅसेजेस पालकांच्या भीतीसोबत खेळत आहेत आणि वास्तविक घटनेविषयी दिशाभूल करणारे विधाने पसरवत आहेत.

तर, खरे काय आहे? आणि खोटे काय आहे?

खरे:

  • गाझियाबाद स्थित फार्मास्युटिकल कंपनीद्वारे उत्पादित ओरल पोलिओ लस (ओपीव्ही) च्या काही बॅचमध्ये पोलिओ टाईप 2 व्हायरस आढळल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तरीही फर्मच्या मॅनेजिंग डायरेक्टरला शनिवारी अलीकडेच अटक करण्यात आले होते.
  • 2016 मध्ये जागतिकरित्या टाईप 2 व्हायरस संपुष्टात आणण्यात आला होता कारण त्यामध्ये फायद्यांपेक्षा जास्त जोखीम होती म्हणून कोणतीही एक कंपनी ओपीव्ही चा समावेश असलेला टाईप-2 पोलिओ व्हायरस कसा रिलीज करू शकते या तपासणी दरम्यान, सर्व विभागीय पुरवठादारांकडून ओरल पोलिओ लस च्या नमुन्याची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पोलिओ टाईप 2 व्हायरस स्ट्रेन भारतासह जगभरामध्ये नष्ट करण्यात आले.
  • आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की एखाद्या विशिष्ट कंपनीने पुरवलेली ओरल पोलिओ लस ‘स्टँडर्ड गुणवत्तेची नाही' असे आढळले या विषयी काही मिडीयाच्या सेक्शन ने रिपोर्ट केल्यानंतर, पोलिओ च्या थेंबामध्ये काही प्रकारचे व्हायरस आहेत ही अफवा पसरत आहे.
  • बायोमेड प्रा.लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर, जे फक्त सरकारी लसीकरण कार्यक्रमांसाठीच पोलिओ लस पुरवित होते आणि खासगी रिटेल साठी नाही, त्यांना केंद्रीय औषध नियामकाने या प्रकरणात एफआयआर दाखल केल्यानंतर अटक करण्यात आली.
  • ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कंपनीला पुढील आदेशापर्यंत "उत्पादन, विक्री किंवा वितरण थांबविण्यास सांगितले आहे." किमान 50,000 व्हायल्स स्कॅनरखाली आहेत.
  • हि पोलिओ ची लस ज्या व्हायल्स मध्ये येते ती सुरक्षा यंत्रणेसोबत तयार केली जाते. लसीचा वरील भाग सहसा वेगळ्या कलर चा असतो आणि ती खराब झाली तर, व्हायल चा कलर बदलतो.
  • सध्या बायोमेड व्यतिरिक्त इतर कंपन्यांद्वारे उत्पादित केलेल्या आणि सामान्य रिटेल आउटलेट्सकडून विकत घेतलेल्या ओपीव्ही प्रशासित करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहेत.
  • आरोग्य मंत्रालयाने असेही विधान केले की: बीओपीव्ही व्हायल्स मध्ये आढळलेला टाईप 2 लस व्हायरस क्षीण (कमकुवत) पोलिओव्हायरस आहे आणि यामुळे पॅरालीसीस होत नाही आणि पूर्वी एप्रिल 2016 पर्यंत तो टीओपीव्हीमध्ये सुद्धा वापरला गेला होता. अशा प्रकारची लस प्राप्त करणारे सामान्यत: 4-6 आठवड्यांत फिकल मार्गाने लसीचा विषाणू काढून टाकतील त्यानंतर ते मरतील. "
  • तर, भारत सरकारनुसार, ओपीव्ही प्रशासित करण्यासाठी सुरक्षित आहे.

खोटे:

X सर्व पोलिओ ड्रॉप लसीकरण (ओपीव्ही) मिसळलेले(भेसळयुक्त) आहेत.

X सर्व पालकांनी त्यांच्या मुलांना ओपीव्ही देणे थांबवावे, विशेषत: पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना


आमचे वाचक आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हँडलकडील ट्वीट सुद्धा बघू शकतात:

आरोग्य मंत्रालायचे ट्वीट

आरोग्य मंत्रालय

#पोलिओ लस सुरक्षित आणि प्रभावी आहेत

http://www.pib.nic.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1548658#.W7YkXYVZinQ.twitter …

https://twitter.com/twitter/statuses/1048118393600004098

✔ @ MoHFW_INDIA

#पोलिओ लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रत्येक मुलाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. लसेने लाखो मुलांना पोलिओच्या दुष्परिणामांपासून बऱ्याच दशकांपासून वाचवले आहे आणि असे करणे सुरू ठेवेल. पालकांनी त्यांच्या मुलांना पोलिओचे लसीकरण केले पाहिजे #पोलिओमुक्तरहा #स्वस्थभारत

ट्विटर वापरकर्ते, डॉ. जालम एस राठोड यांनी भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या निवेदनाची प्रत देखील ट्विट केली.

डॉ. जालम एस राठोड @ drjsrathore

पोलिओ लस असुरक्षित आहे हे सोशल मिडियामध्ये विस्तृतपणे पसरलेल्या अफवाविरुद्ध हि नोट शेअर करत आहे. अफवाचा विरोध करण्यासाठी हि सामान्य लोकांकडे पसरविण्याची विनंती करीत आहोत ... # पोलिओ

आमचे वाचक मूळ प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (जीओआय) निवेदन येथे वाचू शकतात:

तसेच आमचे वाचक, खालील लिंक्स मधील सामग्री वाचून आणि उत्पन्न झालेले अनेक पॉइंटस समजून घेण्यासाठी आणि विस्तृत दृष्टीकोनासाठी या गोष्टीच्या आधारावर स्वयं- तपासणी करू शकतात.

काही लिंक्स:

टीओआय

उत्तरप्रदेश मध्ये संसर्गित पोलिओ लस व्हायल्स परत मागवण्यात आल्या, निर्मात्या विरुद्ध एफआयआर दाखल

गाझियाबाद फार्मा फर्मद्वारे पुरविण्यात आलेल्या ओरल लसीत आढळला संसर्गित पोलिओ थेंब

एनडीटीव्ही

फायनान्शिअल एक्सप्रेस

बिझनेस स्टँडर्ड

द हंस इंडिया

निष्कर्ष:

फॅक्ट क्रिसेंडो त्यांचा वाचकांना अनावश्यक आणि दिशाभूल करणाऱ्या व्हॉट्सअॅप फॉरवर्ड ला बळी न पडण्याचा सल्ला देतो. जेव्हा शंका असेल तेव्हा आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राला भेट द्या, तुमच्या मुलाच्या बालरोगतज्ञांशी बोला, आरोग्य मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट किंवा ट्विटर अकाउंट पहा किंवा ऑनलाईन विविध तथ्य तपासणी करणाऱ्या वेबसाइट्सला भेट द्या.

Tags:    

Similar News