गौतम गंभीरच्या 'युद्धाच्या' ट्विटवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया, सत्य की असत्य

Update: 2019-02-18 11:23 GMT

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी भूमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ने घेतली आहे. सरकारने पाकिस्तानशी चर्चा करू नये, त्यांना त्यांच्या भाषेतच समजवावे, अशी मागणी गंभीरने केली आहे. गंभीरच्या या तीव्र नाराजीवर पाकिस्तानचा फलंदाज शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे का? हे सत्य की असत्य, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

ही बातमी सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
लोकमत
आक्राईव्ह लिंक

फेसबुकवरील लोकमतच्या या पोस्टला चार हजार जणांनी लाईक केले आहे. या बातमीवर 45 जणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हे वृत्त 19 जणांनी शेअर केले आहे.

Full View

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

टाईम्स नाऊ न्यूज डॉट कॉमनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या व्हिडीओत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहीर आफ्रिदी त्याला काय झालं? अशी प्रतिक्रिया पत्रकारांना देत आहे. आफ्रिदीने याहून अधिक काही याविषयावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

टाईम्स नाऊ न्यूज डॉट कॉम
आक्राईव्ह लिंक

इंडिया टीव्ही न्यूज डॉट कॉमने याबाबतचे वृत्त दिले आहे. गौतम गंभीर आणि शाहीद आफ्रिदी या दोघांमध्ये अनेकदा भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी खटके उडतात. याकडंही या संकेतस्थळाने लक्ष वेधले आहे. आफ्रिदीनं केवळ त्याला काय झालं? एवढाच प्रश्न विचारला आहे.

इंडिया टीव्ही न्यूज डॉट कॉम
आक्राईव्ह लिंक

ग्रीन टीम या फेसबुक पेजवर शाहीद आफ्रिदीची ही प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया एक लाख 42 हजार जणांनी पाहिली आहे. ही प्रतिक्रिया तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता.

Full View

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

गौतम गंभीरच्या 'युद्धाच्या' ट्विटवर शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया देताना त्याला काय झाले, असे विचारले आहे. त्याने युध्दाच्या ट्विटवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आहे. त्यामुळं ही प्रतिक्रिया सत्य आहे.

Title: गौतम गंभीरच्या 'युद्धाच्या' ट्विटवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया, सत्य की असत्य
Fact Check By: Dattatray Gholap
Result: True

Similar News