काय देशभक्ती गीते वाजविल्याने झाली दंगल?

By :  amruta
Update: 2019-02-14 16:26 GMT

सुरक्षित आणि शांत वातावरणात मानवाला रहायला आवडते. भारत हा शांतताप्रिय देश आहे. पण कधी कधी एखाद्या छोट्या कारणाचे मोठे स्वरूप होते आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होते.

कथन

भारतात २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दोन राष्ट्रीय सण साजरे केले जातात. अशा सणांच्या निमित्ताने देशभक्तीपर गीते लावण्यात येतात. त्यामुळे वातावरण सर्व देशभक्तीपर होवून जाते. मध्य प्रदेशांत २६ जानेवारी २०१९ ला देशभक्ती गीत वाजविल्याने मध्य प्रदेशातील एका भागात काही टवाळखोर मुलांनी दंगल केली, त्यानंतर त्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले होते. पण काय खरेच देशभक्तीपर गीते वाजविल्याने दंगल झाली का? याबद्दलचे सत्य जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न...!

Full View

आरकाइवपोस्ट

https://twitter.com/ravisinghTV/status/1089546685896949761

आरकाइवपोस्ट

Rational l Right log l Patrika l Opindia

अर्काइव्हलिंकl अर्काइव्हलिंक l अर्काइव्हलिंक | अर्काइव्हलिंक

तथ्य पडताळणी

या विडीओमध्ये जी विध्यार्थी माध्यमांना बोलत आहे तेव्हा तीने सांगितले सर्वात आधी राष्ट्रगीत झाले, त्यानंतर एक गाणे वाजले.... ते कोणते गाणे वाजले आहे हे स्पष्टपणे सांगितले नाहीये. तसेच Patrika वृत्तापत्रात गदर चित्रपटातील देशभक्ती गीत वाजविल्यानंतर एका विशिष्ट समाजाच्या माथेफिरूंनी मारामारी सुरु केली. त्यामध्ये काही विध्यार्थी जखमी झाले.

या संदर्भातील खरेपणा जाणून घेण्यासाठी आम्ही मध्य प्रदेशातील राजगढ अंतर्गत खुजनेर गावात जिथे ही घटना घडली त्या परिसरातील पोलीस अधीक्षक प्रशांत खरे यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी आमचे प्रतिनिधी सोबत बोलतांना ते म्हणाले.....

‘’ही घटना मध्यप्रदेश मधील राजगढ अंतर्गत खुजनेर गावात २६ जानेवारीला घडली आहे. घटनास्थळी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी सर्व घटना घडामोडींचा अभ्यास केला असता, प्रथम दर्शनी हे प्रकरण एका मुलीची छेड काढण्यावरून सुरु झाले. त्यावरून छेड काढणाऱ्या मुलाला विरोध केला तर, छेडछाड करणाऱ्या मुलाने स्वतःच्या समर्थनार्थ काही आणखीन मुलांना आणि लोकांना बोलावून घेतले. ही सर्व लोकं हातात काठी आणि तलवारी घेवून घटनास्थळी पोहोचल्या. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त आधीच केलेला होता. त्यामुळे अशा टवाळखोर लोकांच्या हातातून पोलिसांनी वेळीच काठ्या लाठ्या आणि तलवारी जब्त केल्या. आणि घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या हेतूने कलम १४४ लागू करण्यात आले.

यासंधर्भात पुढे बोलतांना ते म्हणाले की, सुरुवातीला घटनास्थळी काही प्लास्टिकच्या खुर्च्या मोडलेल्या आढळल्या. पण कोणत्याही शाळकरी विध्यार्थी किंव्हा विध्यार्थिनीला कोणत्याही प्रकारची इजा किंव्हा जखम झाली नाहीये. तसेच शाळकरी विध्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा तलवारीने हमला झालेला नाहीये. अशा प्रकारची बातमी ही संपूर्णपणे खोटी आहे. त्याचप्रमाणे सोशल मिडीयावर ज्या विध्यार्थ्यीनीचा विडीओ दाखवत आहेत. तो चुकीच्या संदर्भाने दाखवत आहेत. हा विडीओ तेव्हा घेतला आहे जेव्हा, त्या संपूर्ण घटनेमुळे ती विध्यार्थीनी घाबरलेली होती. अशा वेळी आधीच घटना घडामोडींमुळे घाबरलेली असतांना विध्यार्थीनीवर प्रसारमाध्यमांनी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर घाबरून तशी प्रतिक्रिया आली आहे.

त्याचप्रमाणे घटनास्थळावरील दोन्ही गटातील लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सब इन्स्पेक्टर रामकुमार रघुवंशी करत आहेत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांवर लाठ्या काठ्या आणि तलवारीने हमला करण्यात आला हे पूर्णपणे खोटे आहे.’’

निष्कर्ष :
मध्य प्रदेशांत राजगढ जिल्ह्यातील खुजनेर येथे देशभक्तीपर गीत वाजविल्यानंतरच दंगल झाली का? याबाबतीत तथ्य पडताळणी केल्यानंतर ही देशभक्ती गीते वाजविल्यावर होणारी दंगल खोटी असून, शाळकरी विध्यार्थिनी – विध्यार्थी जखमी झाले आहेत हे देखील खोटे आहे. पण त्या परिसरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती हे खरे आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या परिसरात काही काळासाठी कलम १४४ लागू केले होते.

Title: काय देशभक्ती गीते वाजविल्याने झाली दंगल?
Fact Check By: Amruta Kale
Result: Mixture

Similar News