जी-20 निमित्त आग्रामध्ये केलेल्या सजावटीचा व्हिडिओ औरंगाबादच्या नावाने व्हायरल; वाचा

Update: 2023-03-02 13:44 GMT

छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) नुकतीच जी-20 आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती.

विद्युत रोषणाई, पाण्याचे कारंजे आणि चित्रकारीने नटलेल्या शहरातील देखाव्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले जाऊ लागले.

असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून दावा केला जात आहे की, तो छत्रपती संभाजीनगर येथील आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, सजावटिचा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा (औरंगाबाद) नसून उत्तर प्रदेशातील आग्रा शहराचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

21 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये विविध ठिकाणी केलेली सजावट व रोषणाई दिसते. दावा केला जाता आहे की, हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरचा (औरंगाबाद) आहे.

Full View

मूळ पोस्ट -- फेसबुक | आर्काइव्ह | इंस्टाग्राम

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओचे निरीक्षण केल्यावर एका मंडपावर ‘वेलकम टू द सिटी ऑफ ताज’ असे लिहिलेले दिसते. उत्तर प्रदेशमधील आग्रा शहराला ‘सिटी ऑफ ताज’ म्हणतात.

हा धागा पकडून अधिक माहिती घेतल्यावर कळाले की, 11 व 12 फेब्रुवारी 2023 रोजी उत्तर प्रदेशतील आग्रा शहरामध्ये जी-२० शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. 

झी न्यूज उत्तर प्रदेश चॅनलनुसार, विदेशी प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आग्रा शहरात रोषणाई करण्यात आली होती. पुष्पवृष्टीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले होते.

https://youtu.be/aW0f7NiuDCA

याच बातमीत एका ठिकाणी बस दिसते जी व्हायरल व्हिडिओमध्येसुद्धा दिसते. 

गुगल मॅपवर कीव्हडर्स सर्च केल्यावर कळाले की व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेले ताज हॉटेल आगऱ्यात आहे.

खालील फोटोमधील तुलना पाहिल्यावर कळते की, दोन्ही फोटो एकाच हॉटेलचे आहेत.

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विमानतळावर आंतरराष्ट्रीय जी - 20 परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले होते. 

https://youtu.be/HfKOPIFVuOg

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, सजावटीचा व्हिडिओ औरंगाबादचा (छत्रपती संभाजीनगर) नसून उत्तर प्रदेशातील आग्रा शहराचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:जी-20 निमित्त आग्रामध्ये केलेल्या सजावटीचा व्हिडिओ औरंगाबादच्या नावाने व्हायरल; वाचा

Fact Check By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News