उसळणाऱ्या लाटांचा हा व्हिडिओ स्पेनमधील आहे; कोकणातील नाही, वाचा सत्य

Update: 2021-05-17 12:49 GMT

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागालासुद्धा तडाखा बसत आहे. समुद्राच्या रौद्ररुपाचा एक व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो कोकणतील कुणकेश्वर किनाऱ्यावरील उसळणाऱ्या लाटांचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ महाराष्ट्रतील नसून स्पेनमधील आहे.

काय आहे दावा?

खवळलेल्या समुद्राच्या 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये किनाऱ्यावर उंच-उंच लाटा धडकत असल्याचे दिसते. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कुणकेश्वर बीचवरील आहे.

Full View

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

एवढेच नाही तर टीव्ही चॅनेलद्वारेसुद्धा हा व्हिडिओ दाखवला आहे. ‘टीव्ही-9 मराठी’ने सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा देणाऱ्या बातमीत हाच व्हिडिओ वापरला.

https://www.youtube.com/watch?v=9NiyATF_Tbs

हा व्हिडिओ खरंच सध्या आलेल्या तौते चक्रीवादळामुळे कुणकेश्वर किनारपट्टीवर उसळलेल्या लाटांचा आहे का, याचा फॅक्ट क्रेसेंडोने शोध घेतला.

तथ्य पडताळणी

व्हिडिओमध्ये किनारपट्टीलगत असणाऱ्या सुविधा आणि बांधकाम पाहून हा व्हिडिओ कुणकेश्वरमधील नसल्याचा संशय येतो. त्यानुसार की-वर्ड्सद्वारे शोध घेतला. तेव्हा युट्युबवर या जागेवर धडकणाऱ्या लाटांचे अनेक व्हिडिओ सापडले.

त्यापैकी काहींचे बारकाईने निरीक्षण केल्यावर जानेवारी 2021 महिन्यात अपलोड केलेला खाली व्हिडिओ सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओशी साधर्म्य असल्याचे आढळले. व्हिडिओच्या शीर्षकानुसार हा व्हिडिओ उत्तर स्पेनमधील असल्याचे म्हटले आहे.

https://youtu.be/o_wFQpHqrZw

वरील व्हिडिओच्या 1.45 मिनिटांपासून पुढील भाग कट करून कणकेश्वरमधील लाटा म्हणून फिरवण्यात येत आहे.

मग आम्ही हा व्हिडिओ खरंच स्पेनमधील आहे का याचा शोध घेतला. त्यासाठी ही जागा नेमकी कोणती आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

स्पेनमधील लाटांविषयी माहिती घेतल्यावर कळाले की, तेथील सॅन सॅबॅस्टिअन शहरातमध्ये उंचच्या उंच लाटा धडकत असतात. लाटांचे हे दृश्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक तेथे जातात.

गुगल मॅपवर शोध घेतल्यावर कळाले की, सदरील व्हिडिओ सॅन सॅबॅस्टिअन शहरातील Paseo Nuevo अर्थातच New Promenade नावाच्या भागातील आहे. तेथील हा प्रसिद्ध पादचारी मार्ग आहे. खाली दिलेल्या गुगल मॅपमध्ये तुम्ही ही जागा पाहू शकता.

Full View

व्हिडिच्या डाव्याबाजुला पादचारी मार्ग संपतो आणि दुरवर एक डोंगर दिसतो. वर दिलेल्या गुगल मॅपमध्येसुद्धा तो दिसतो.

आता या जागेतील लँडमार्क्स आणि व्हायरल व्हिडिओत दिसणारी जागा यांचा तुलना करुया. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी दिसणारा रस्त्याचा कठडा आपण गुगल मॅपमध्ये आहे का याचा शोध घेतला. स्ट्रीट व्ह्युवच्या मदतीने शक्य झाले.

यावरून हे स्पष्ट होते की, हा व्हिडिओ स्पेनमधीलच आहे.

मग हा व्हिडिओ नेमका कुठे उभा राहून चित्रित केला असेल?

या प्रश्नाचे उत्तर आम्ही गुगल अर्थच्या मदतीने शोधले.

3-डी व्ह्युवच्या मदतीने ती नेमकी जागा खाली लाल व पिवळ्या वर्तुळात दर्शविली आहे. लाल चौकोनात वरील कठडा दिसत आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, उसळणाऱ्या लाटांचा हा व्हिडिओ कुणकेश्वर येथील नाही. हा व्हिडिओ स्पेनमधील सॅन सॅबॅस्टिअन शहरातील आहे. स्पेनमधील जुना व्हिडिओ महाराष्ट्रातील म्हणून चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे.

आपल्याकडेदेखील अशा काही संशयास्पद पोस्ट असतील तर पडताळणीसाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) वर पाठवा.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:उसळणाऱ्या लाटांचा हा व्हिडिओ स्पेनमधील आहे; कोकणातील नाही, वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False

Tags:    

Similar News