म्यानमारमधील लोकांनी बेकायदेशीर मणिपूरमध्ये प्रवेश करतानाचा हा व्हिडिओ नाही.

Update: 2023-08-16 17:17 GMT

काही दिवसांपुर्वी मणिपूरमध्ये स्थानिक आणि सौनिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते तेव्हा म्यानमारमधील काही लोकांनी बेकायदेशीरपणे मणिपूरमध्ये प्रवेश केल्याची घटना समोर आली होता.

या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओमध्ये बाळाला पाठिवर घेऊन काही महिला थोकादायक पर्वतीतून वाट काढत आहे, दावा केला जात आहे की, अशा प्रकारे जीव धोक्यात घालून म्यानमारमधील लोक बेकायदेशीरपणे मणिपूरमध्ये प्रवेश करतात.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून याबाबत सत्यता विचारली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ मणिपूर किंवा म्यानमारातील नसून, इराणमधील आहे.

काय आहे दावा ?

व्हिडिओमध्ये काही महिला थोकादायक पर्वतीतून वाट काढताना दिसतात.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “म्यानमार ते मणिपूर असा चोर मार्ग बनवला आहे, हे लोक भारतात येण्यासाठी आपला जीव धोक्यात कसा घालतात आणि मग भारताच्या संसाधनात वाटा कसा मागतात.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर यारण या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ शेअर करताना कुर्द भाषेत (इराणीमध्ये बोली जाणारी भाषा) कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “गावातील रहिवाशांचे कठीण दैनंदिन जीवन !”

Full View

सदरील महितीच्या आधारे आधिक सर्च केल्यावर एका तुर्की युट्यूब चॅनलवर संपुर्ण व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ 12 मार्च रोजी आपलोड करण्या आला होता. हा व्हिडिओ इराणचा आसल्याचे सांगण्यात आले आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलेले होते की, "तीन लहान मुलांसह एक इराणी भटके कुटुंब त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी कठीण मार्गाने प्रवास करत आहे."

व्हिडिओ खाली वर्णन केले आहे की, “हे युट्यूब चॅनल इराणीमधील भटक्यांचे जीवन दर्शवते, तसेच या ठिकाणी माउंट देना येथे राहणाऱ्या लोकांच्या भटक्या पर्वतीय जीवनाचे वर्णन केलेले आहे.”

https://youtu.be/i6KZgih_lLo

खालील मूळ व्हिडिओ आणि व्हायरल व्हिडिओमधील स्क्रीनशॉटची तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, दोन्ही व्हिडिओ एकच आहे.

मणिपूरमधीन म्यानमारवासीच काय झाल ?

टाईम्य ऑफ इंडियाच्या बातमीनुसार मणिपूरचे संयुक्त सचिव आणि नोडल (विशेष मोहिम) अधिकारी पीटर सलाम यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, मणिपूर राज्यातील बेकायदेशीर म्यानमार स्थलांतरितांना बायोमेट्रिक पकडण्याची मोहीम सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल.

https://youtu.be/GZVmBdzT70A

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ मणिपूर किंवा म्यानमारशी संबंधित नसून तो इराणमधील ‘माउंट देना’ या ठिकाणाचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:म्यानमारमधील लोकांनी बेकायदेशीर मणिपूरमध्ये प्रवेश करतानाचा हा व्हिडिओ नाही.

Written By: Sagar Rawate

Result: False

Tags:    

Similar News