जखमी शिख व्यक्तीचा व्हायरल फोटो शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही; वाचा सत्य

Update: 2024-02-22 18:18 GMT

शेतकरी संघटनांनी किमान आधारभूत किमतींच्या मागणीसाठी 13 फेब्रुवारी रोजी ‘चलो दिल्ली’ मोर्चा काढला होते. परंतु, शेतकऱ्यांना सीमेवरच रोखून ठेवण्यासाठी अडथळे निर्माण करण्यात आले असून त्यांच्यावर ड्रोनच्या साह्याने अश्रुधुराचा मारा केला गेला.

या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका शिख व्यक्तीच्या पाठीवर अनेक जखमा आणि ओळी उठेलेल्या दिसतात.

दावा केला जात आहे की, हा फोटो शेतकरी आंदोलनादरम्यानचा असून पोलिसांनी केलेल्या लाठी चार्जमध्ये हा आंदोलक जखमी झाला आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये एका जखमी शिख व्यक्तीच्या पोस्ट खाली लिहिले होते की, “मोदी सरकार दिल्लीमध्ये शेतकऱ्यावर असे घाव घालून राहिली जय जवान जय किसान मोदी हटाव देश बचाव.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो 5 वर्षांपूर्वीचा आहे. 

शिखसंघर्ष नामक एका ट्विटर अकाउंटने 17 जून 2019 रोजी व्हायरल फोटोसोबत त्या जखमी शिख व्यक्तीचे इतर ही फोटो शेअर केले.

फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मुखर्जी नगर पोलीस ठाण्याच्या बाहेर एका शीख ऑटो चालकाला आणि त्याच्या मुलाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली.”

https://twitter.com/SikhSangarsh/status/1140332923629051908

दैनिक जागरणच्या बातमीनुसार व्हायरल फोटोमधील पिडीत व्यक्तीचे सरबजीत सिंग असून ही घटना जून 2019 मध्ये घडली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सरबजीत सिंग याने किरपाने पोलिसांवर हला केल होता. या झटापटीत त्याला या जखमा लागल्या असाव्यात.

या घटनेनंतर घटना स्थळी असलेले पोलिस अधिकारी योगराज आणि सरबजीत सिंग या दोघांनीही एकमेकांविरोधात हल्ला केल्याप्रकरणी तक्रार नोंदवली असून या प्रकणाची चौकशीची जबाबदारी दिल्ली गुन्हा शाखेकडे सोपवण्यात आली होती. अधिक महिती येथे वाचू शकता.

https://youtu.be/nY-0oSQOVQ8?si=B8sMBCilD5usENRS

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोसोबत केलेला दावा खोटा आहे. 5 वर्षांपूर्वीचा दिल्लीत पोलिसांशी झालेल्या झटापटीत जखमी झालेल्या रिक्षाचालक सरबजीत सिंगचा फोटो शेतकरी आंदोलनाशी जोडून शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:जखमी शिख व्यक्तीचा व्हायरल फोटो शेतकरी आंदोलनाशी संबंधित नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Tags:    

Similar News