सत्य पडताळणी : साक्षी महाराज, उमा भारती, मोदींनी केली होती का ही वक्तव्ये

Update: 2019-04-10 13:51 GMT

(छायाचित्र सौजन्य : हिंदूस्थान टाईम्स)

“2019 से पहले राममंदिर नही बना तो राजनीति छोड दूँगा, 2018 से पहले गंगा नहीं साफ हुई तो हम जल समाधि ले लेंगें, 100 दिनों मे अगर काला धन नहीं आया तो मैं फांसी पर चढ जाऊंगा, काला धन आया तो यूं ही सब ते खाते में 15-20 लाख आ जाएगा” अशी साक्षी महाराज, उमा भारती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्र असलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

Full View

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

भाजप खासदार साक्षी महाराज यांनी 2019 च्या पूर्वी राममंदिर न झाल्यास आपण राजकारण सोडू, असे म्हटले का याची आम्ही तथ्य पडताळणी करत असताना आम्हाला डेक्कन हेरॉल्डचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तात कुठेही साक्षी महाराज यांनी 2019 च्या पूर्वी राममंदिर न झाल्यास आपण राजकारण सोडू, असे म्हटलेले नाही.

आक्राईव्ह लिंक

हिंदूस्थान टाईम्सच्या एका व्हिडिओत उमा भारती यांनी गंगा शुध्दीकरण न झाल्यास आपण प्राणाचा त्याग करु असं म्हटलंय पण त्यांनी जलसमाधी असा शब्दप्रयोग केलेला नाही.

https://www.youtube.com/watch?v=lVDiYloNqjY

नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ यू टुयूबवर दिसत असून यात ते काळा पैसा परत आणण्याविषयी बोलत पण यात त्यांनी यात 100 दिवसात परत आणू आणि परत न आणल्यास फासावर चढू असे म्हटलेले नाही.

https://www.youtube.com/watch?v=i1Lw53W_AkM

खाली दिलेल्या लिंकमध्ये मोदी हे काला धन आया तो यूं ही सब ते खाते में 15-20 लाख आ जाएगा असे म्हणताना दिसत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=EbdFJ2vg3ic

फायनाशल एक्स्प्रेसने 27 नोव्हेंबर 2014 रोजी दिलेल्या एका वृत्तात 100 दिवसात काळे धन परत आणू असे म्हटले नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

साक्षी महाराज यांनी राम मंदिराबाबत विधान केले आहे पण त्यांनी 2019 पूर्वी राम मंदिर न बदल्यास राजकारण सोडू असे म्हटलेले नाही. उमा भारती यांनीही प्राणत्याग करु असे म्हटले आहे. पण जलसमाधी घेऊ असे म्हटलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळे धन परत आणू असे म्हटले आहे पण त्यांनी कोणतीही मूदत दिलेली नाही. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट संमिश्र आढळली आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:सत्य पडताळणी : साक्षी महाराज, उमा भारती, मोदींनी केली होती का ही वक्तव्ये

Fact Check By: Dattatray Gholap

Result: Mixture

Similar News