उत्तर प्रदेशमधील व्हिडिओ भिवंडी दगडफेक प्रकरणातील अरोपींना ठाण्यात मारण्याचा म्हणून व्हायरल

Update: 2024-09-27 14:34 GMT

मुंबईतील भिवंडी भागात गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. 18 सप्टेंबर रीज रात्री वंजारपट्टी नाका परिसरात झालेल्या या घटनेनंतर काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात काही लोकांना बेदम मारहाण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुंबई पोलिसांनी भिवंडीतल गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या मुस्लिम दंगेखोरांना अटक करून असा चोप दिला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील आहे. जुना आणि असंबधित व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये म्हटले की, “भिवंडी पद्मा नगर येथे गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी गणपतीची तोडफोड करणाऱ्या लोकांना गणपतीचा महाप्रसाद.”

Full View

मूळ पोस्ट – इन्स्टाग्राम 

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, द लॅलनटॉपने 15 जून 2022 रोजी या व्हिडिओविषयक बातमी प्रकाशित केली होती. त्यानुसार भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मानी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे १० जून २०२२ हिंसाचार झाला होता. या प्रकरणी सहारनपूर पोलिसांनी 50 पेक्षा अधिक आरोपींना अटक केले होते. तसेच सर्वप्रथम आमदार शलभ मणी त्रिपाठी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता.

 

 

आरोपींना मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहारनपूर पोलिसांवर तीव्र टीका झाली होती. आधी सहारनपूर पोलिसांनी या व्हिडिओतील घटनेबाबत नकार दिला होता परंतु, त्यांनी जारी केलेल्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये मार खाणारेच आरोपी दिसतात. 

यावरून स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ सहारनपूर पोलिस ठाण्यातीलच आहे. यानंतर पोलिसांनी चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले होते.

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये पोलिसांनी अटक केलेले कथित आरोपी आणि मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे लोक एकच आहे. मूळ फोटो ‘जागरण’ वृत्तातून घेण्यात आला आहे.

 


विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात हाच व्हिडिओ मिरारोड येथे आयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त झालेल्या दंगलप्रकरणातील आरोपींच्या नावाने व्हायरल झाला होता. अधिक माहिती येथे वाचा.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ भिवंडीतील दगडफेक प्रकरणातील नाहीत. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे 2022 मध्ये झाल्येल्या हिंसाचारात अटक केलेल्या आरोपींचा आहे. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Claim :  मुंबई पोलिसांनी भिवंडीतल गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या मुस्लिम दंगेखोरांना अटक करून चोप दिला
Claimed By :  Social Media User
Fact Check :  FALSE

Similar News