भारत सरकारने रवींद्रनाथ टागोरांचे दहा हजाराचे नाणे चलनात आणले नाही; वाचा सत्य

Update: 2023-10-27 13:48 GMT

अहमदनगर येथे एका ग्राहकाने दुकानदाराला रवींद्रनाथ टागोर यांचे दहा हजाराचे नाणे दिले, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बातमीत दावा केला जात आहे की, भारत सरकारने दहा हजाराचे नाणे चलनात आणले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील रवींद्रनाथ टागोर यांचे दहा हजाराचे नाणे चलनातील नसून हे केवळ ‘संकलन नाणे’ आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमधील बातमीनुसार “भारत सरकारने 2011 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 10,000 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते. 100, 200, 500 आणि 2000 च्या नोट प्रमाणे आता हे 10,000 नाणे चलनातील आहे. कमी जागेत जास्त रक्कम वापरण्यासाठी या नाण्याचा उपयाग होऊ शकतो परंतु, या चलनी नाण्याचा तोटा म्हणजे जर हे नाणे हरवले किंवा चोरीला गेलेतर सरळ दहा हजाराचा फटका बसू शकतो.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अहमदनगर येथे आज अखेर १० हजार रुपयांचे भारतीय चलनी नाणे बाजारात...नागरिकांची एकच झुंबड.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर अ‍ॅमेझॉन या वेबसाइटवर हे नाणे आढळले. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “रवींद्रनाथ टागोर 10000 RS सिल्व्हरप्लेटेड फॅन्टसी टोकन मेमोरियल कॉइन.”

तसेच या ठिकाणी एका फोटोमध्ये लिहिले होते की, “कृपया लक्षात ठेवा – टागोरांना आदरांजली देण्यासाठी नाण्याच्या स्वरूपात ही कलाकृती तयार करण्यात आली असून हे नाणे केवळ संकलन, प्रदर्शन आणि सजावटीच्या हेतूसाठी आहे.”

खालील फोटोमध्ये आपण अ‍ॅमेझॉन वेबसाइटचे स्क्रीनशॉट पाहू शकतात. 

मूळ पोस्ट – अ‍ॅमेझॉन

पुढे अधिक सर्च केल्यावर कळेल की, ई-कॉमर्स वेबसाईट सोडल्यास हे नाणे कुठे ही आढळत नाही.

स्मारक नाणे

भारत सरकारतर्फे एखाद्या विशिष्ट घटनेच्या स्मरणार्थ किंवा एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त विशिष्ट डिझाइनसह “स्मारक नाणी” जारी केली जातात.

‘स्मारक नाणी’ बनवण्याचे काम ‘द गव्हर्मेंट मिंट’ संस्था कोलकातामध्ये करत असते.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, 2011 मध्ये द गव्हर्मेंट मिंट संस्थेने रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त 150 रुपयांचे ‘स्मारक नाणे’ जारी केले होते.

परंतु, व्हायरल दाव्यानुसार “भारत सरकारने 2011 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दहा हजार रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते.” असा उल्लेख कुठे ही आढळत नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील रवींद्रनाथ टागोर यांचे दहा हजाराचे नाण चलनातील नसून हे नाणे केवळ संकलन, प्रदर्शन आणि सजावटीच्या हेतूंसाठी आहे. भ्रमक दाव्यासह बातमी व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:भारत सरकारने रवींद्रनाथ टागोरांचे दहा हजाराचे नाणे चलनात आणले नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Missing Context

Tags:    

Similar News