भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात टीका केली का ? वाचा सत्य

Update: 2024-07-06 17:44 GMT

शेहजादा पूनावाला यांनी आरएसएस संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू नसून ते ढोंग करत आहेत, असे म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, शेहजादा पूनावाला यांनी भाजप प्रवक्ते पदावर असतांना त्यांनी आपल्याच पक्ष आणि नरेंद्र मोदींन विरोधात वक्तव्य केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 7 वर्षांपूर्वीचा असून शेहजादा पूनावाला तेव्हा काँग्रेसमध्ये होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये शेहजादा पूनावाला एका पत्रकार परिषदेत म्हणतात की, “आरएसएस संघ आणि भाजप हिंदू नसून ते ढोंग करत आहेत. तसेच नरेंद्र मोदींनी चारधामची यात्रादेखील केली नाही. यांच्या पैक्षातर दिग्विजय सिंह सनातन धर्माला मानतात व सकाळी देवाची पूजा करतात.”

Full View

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 7 वर्षांपूर्वीचा आहे.

हा व्हिडिओ न्यूज लॉन्ड्रीने 14 मार्च 2017 रोजी शेअर केला होता.

व्हिडिओसोबत माहिती दिली की, “लोकसंख्याशास्त्रीय लाभांश, त्यांच्या आकांक्षा आणि भारतातील राजकारणाचे भविष्य.” या मुद्यावर चर्चा करण्यासाठी कन्हैया कुमार, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष राहुल सोनपिंपळे आणि काँग्रेस कडून शेहजाद पूनावाला सहभागी झाले होते.

व्हिडिओमध्ये चर्चेच्या सुरूवातीला सूत्रसंचालक 3:23 मिनिटावर शेहजाद पूनावाला यांचा परिचय काँग्रस कडून आलेली व्यक्ती म्हणून करते.

पुढे चर्चेच्या सुरूवातीला कन्हैया कुमार यांनी आरएसएस आणि भाजप वर टीका केल्यानंतर शेहजाद पूनावाला 7:19 मिनिटावर बोलतात की, “प्रथम आपण समजून घेतले पाहिजे की भाजप आणि आरएसएस ही मनुवादी व्यवस्था का पुढे करत आहेत? भाजप आणि आरएसएस हे हिंदू नाहीत, ते फक्त नाटक आहेत. आजपर्यंत मोदीजींनी चारधामची तीर्थयात्राही केलेली नाही. यापेक्षा जास्त हिंदू तर दिग्विजय सिंह आहेत. सनातन धर्मावर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि ते सकाळी उठून पूजा करतात. मनोज भाई आणि कन्हैया त्यांच्यापेक्षा (भाजप आणि आरएसएस) जास्त हिंदू दिसतात.”

https://youtu.be/B8hnYVdsCfU?si=PwdzoGl8LcdJ7SAh&t=438

शेहजाद पूनावाला भाजप प्रवेश

नोव्हेंबर - डिसेंबर 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्ष पदी बिन विरोध राहुल गांधींची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा पूनावाला यांनी काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांना 'घराणेशाहीचे ढोंग' म्हणत विरोध दर्शवला होता. त्या संबंधित अधिक माहिती आपण येथेयेथे वाचू शकता.

या घटनेनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच 2021 मध्ये त्यांना राष्ट्रीय राजधानीसाठी भाजपच्या सोशल मीडिया शाखेचे प्रभारी देखील बनवण्यात आले. अधिक माहिती येथे वाचू शकता.

निष्कर्श

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 7 वर्षांपूर्वीचा आहे. भाजपच्या प्रवक्ता पदी असताना शेहजाद पूनावाला यांनी आपल्याच पक्षावर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली नाही. काँग्रेस पक्षात असताना मार्च 2017 मध्ये त्यांनी हे वक्तव्य केली होते. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात टीका केली का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Similar News