बॅरिकेड्सवर तलवार घेऊन उभा असलेल्या व्यक्तीचा फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनातील आहे का ? वाचा सत्य

Update: 2024-02-26 17:02 GMT

सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एका फोटो व्हायरल आहे. ज्यामध्ये एक शिख व्यक्ती तलवार घेऊन बॅरिकेड्सवर चढून पुढे जाताना दिसतो.

दावा केला जात आहे की, हा फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा नाही.

काय आहे दावा ?

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहितात की, “दिल्लीतील हा शेतकरी आहे? तलवार घेऊन आंदोलन करत आहे. प्रथम शेतकरी कोण हे ओळखा. हे शेतकरी नसुन भाडोत्री गुंड आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो 3 वर्षांपूर्वीचा आहे.

इंडिया टीव्हीने 26 जानेवारी 2021 रोजी हाच फोटो आपल्या बातमीत छापला होता. फोटोसोबत माहिती दिली आहे की, 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी प्रजासत्ताक परेडदरम्यान शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अक्षरधाममधील रस्त्यावर लावलेले पोलिस बॅरिकेड्स तोडत एक शेतकरी त्यांच्यावर चालत होता. अधिक माहिती येथे वाचू शकता.

इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार भारत सरकारच्या 3 शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्याची मागणी केली होती.

दिल्ली पोलिसांनी परवानगी देताना या रॅलीसाठी एक विशेष मार्ग ठरून दिला होता आणि शेतकरी संघटनांनी त्यांच्या बाजूने कायदा सुव्यवस्था ठेवण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र त्यांनी निर्धारित मार्गाने जाण्याऐवजी प्रतिबंधित मार्गाने जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस आणि शेतकरी यांच्यात झटापट आणि परिस्थिती आणखीनच बिघडली.

द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार आयटीओमधील शेतकऱ्यांचा मोठा गट गाझीपूर आणि सिंघू सीमेवरून आला होता आणि नवी दिल्ली जिल्ह्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, पोलिस व आंदोलकांमध्ये संघर्ष झाला ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले होते आणि नवरीत सिंग या 27 वर्षीय आंदोलकाला आपला जीव गमवावा लागला.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा नाही. हा फोटो 26 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आला असून पहिल्या शेतकरी आंदोलनाचा आहे. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होता आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:बॅरिकेड्सवर तलवार घेऊन उभा असलेल्या व्यक्तीचा फोटो सध्याच्या शेतकरी आंदोलनातील आहे का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Similar News