अमेरिकेत 21 तोफांची सलामी दिले जाणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते आहेत का? वाचा सत्य

Update: 2023-06-16 17:48 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींच्या स्वागताला 21 तोफांची सलामी देऊन देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच जागतिक नेत्याला 21 तोफांची सलामी देण्यात येत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा चुकीचा आहे. अमेरिकेत राज्य भेटीसाठी आमंत्रित सर्वच राष्ट्रप्रमुखांचे स्वागत 21 तोफांची सलामी देऊन करण्यात येते.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आधुनिक जगताच्या इतिहासात म्हणजेच अमेरिका देशाची निर्मिती झाल्यापासून अमेरिका अगदी पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला तोफांची सलामी देणार आहे। आणि अशी 21 तोफांची सलामी अमेरिका मोदींजींना देणार आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

नरेंद्र मोदी त्यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात एकुण सात वेळा अमेरिका दौऱ्यावर गेलेले आहेत. परंतु, पुढील आठवड्यातील अमेरिका दौरा विशेष आहे. कारण यावेळी ते अमेरिकेच्या अधिकृत राज्य भेटीसाठी (State Visit) जात आहेत.

अमेरिकेत परदेशी नेत्यांचे दौरे पाच प्रकारचे असतात. राज्य भेट, अधिकृत भेट, अधिकृत कार्य भेट, कार्य भेट आणि वैयक्तिक भेट असे ते पाच दौरे आहेत. यापूर्वी नरेंद्र मोदी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी किंवा शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेले होते. पुढील आठवड्यात ते प्रथमच अमेरिकेच्या राज्य भेटीला जात आहेत.

काय असते राज्य भेट?

जेव्हा एखाद्या देशाच्या प्रमुखाने दुसर्‍या देशाच्या प्रमुखाला आपल्या देशात येण्याचे औपचारिक निमंत्रण दिलेले असते, तेव्हा त्याला राज्य भेट असे म्हणतात, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी स्वतः पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावित भेटीसाठी आमंत्रण दिले होते. राज्यभेटीमध्ये पाहुण्यांचे स्वागत अतिशय भव्यपणे केले जाते.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या धोरणानुसार, राज्य भेटीवर आलेल्या राष्ट्रप्रमुखाच्या स्वागताला व्हाईट हाऊसच्या दक्षिण बागेत 21 तोफांची सलामी देण्यात येते. तसेच अधिकृत भेटीसाठी आलेल्या नेत्यासाठी 19 तोफांची सलामी देण्यात येते.

डॉ. मनमोहन सिंह यांनासुद्धा मिळाली होती 21 तोफांची सलामी

तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह 2009 साली अमेरिकेच्या राज्य भेटीवर गेले होते. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना आमंत्रित केले होते. अमेरिकेच्या प्रोटोकॉलनुसार तेव्हादेखील डॉ. सिंह यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली होती. डॉ. सिंह यांचा दौरा संपल्यावर 19 तोफांची सलामी देऊन त्यांना निरोप देण्यात आला होता.

एवढेच नाही तर, जॉर्ज बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानादेखील 2005 साली डॉ. सिंह अधिकृत भेटीवर गेले होते. तेव्हासुद्धा त्यांना 19 तोफांची सलामी देण्यात आली होती.

मूळ बातमी – द टाईम्स

इतर राष्ट्रप्रमुखांसाठी 21 तोफांची सलामी

1. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 2015 साली बराक ओबामांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या राज्य भेटीला गेले होते.

https://www.youtube.com/watch?v=g9X0t3xd4cg

2. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात फ्रान्सचे राष्ट्रपती एमान्युएल मॅक्रॉ अमेरिकेच्या राज्य भेटीवर गेले होते.

https://twitter.com/ABCWorldNews/status/988784364095004674

3. पाकिस्तानचे सैन्य प्रमुख जनरल बाजवा 2019 साली अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा पॅन्टागॉन येथे 21 तोफांची सलामी देण्यात आली होती.

https://www.youtube.com/watch?v=zMWb1B-Ze24

4. फिलिपाईन्सचे राष्ट्रपती बाँगबाँग मार्कस गेल्या माहिन्यात अमेरिकेच्या राज्य भेटीला आले होते.

https://www.youtube.com/watch?v=eSaEGdZwbHA

5. सोव्हिएत रशियाचे तत्कालिन राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह 1987 साली रोनाल्ड रेगन यांच्या आमंत्रणावर अमेरिकेच्या राज्य भेटीला गेले होते.

https://www.youtube.com/watch?v=zpkO0ro6AcU

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, अमेरिकेत 21 तोफांची सलामी देण्यात येणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते नाहीत. अमेरिकेत राज्य भेटीवर आलेल्या प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला 21 तोफांची सलामी देण्याची प्रथा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:अमेरिकेत 21 तोफांची सलामी दिले जाणारे नरेंद्र मोदी पहिले जागतिक नेते आहेत का? वाचा सत्य

Written By: Agastya Deokar

Result: Partly False

Tags:    

Similar News