औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूटबॉल स्पर्धेचे आयोजन? : सत्य पडताळणी

By :  amruta
Update: 2019-03-18 09:37 GMT

(Image is only for Representation purpose only . source: Gyani Master)

दिल्ली गेट न्युज या वेब पोर्टलवर औरंगाबाद शहरात होणाऱ्या फूटबॉल स्पर्धेविषयीची बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचे शीर्षक 23 मार्च ते 13 एप्रिल शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन असे देण्यात आले आहे. यासंदर्भात फॅक्ट क्रिसेंडोने केलेली सत्य पडताळणी.

अर्काईव्ह

सत्य पडताळणी

दिल्ली गेट न्युज वेब पोर्टलवर असणाऱ्या बातमीचे शीर्षक खालील प्रमाणे आहे.

औरंगाबादमध्ये फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ही बातमी अनेक संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे. या संकेतस्थळावरील बातमीत शीर्षकात कुठेही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आल्याचे म्हटलेले नाहीये.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे म्हटले आहे.

फेसबुक

Full View

अर्काईव्ह

या संदर्भातील लोकमत वृत्तपत्रातील बातमीमध्ये स्पष्टपणे खुली अखिल भारतीय फूटबॉल स्पर्धा असे म्हटले आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता.

लोकमतअर्काईव्ह

त्याचप्रमाणे दिल्ली गेट न्युज या वेब पेजवर बातमी सोबत असणाऱ्या व्हिडिओमध्ये 1.18 मिनिटापासून ते 1.23 मिनिटापर्यंत अफरोज खान हे पत्रकार परिषदेत नॅशनल लेव्हलची फुटबॉल टुर्नामेंट असे म्हणत आहेत. युट्युबवर दिल्ली गेट न्यूजने 14 मार्च 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=3&v=wSKkYS_gJ2o

अर्काईव्ह

आयोजक आसिफ पटेल यांनी फॅक्ट क्रिसेंडोशी बोलताना सांगितले की, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतलेले फुटबॉल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची फुटबॉल स्पर्धा याविषयी स्पष्टपणे उत्तर दिले नाही.

सर्व तथ्यांचा अभ्यास केला असता, खुली राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा अशा स्वरुपाची ही स्पर्धा आहे. त्यामुळे दिल्ली गेट न्यूज या वेब पेजवर असणाऱ्या बातमीचे शीर्षक चुकीचे आहे.

निष्कर्ष
दिल्ली गेट न्यूज या संकेतस्थळावर असलेले 23 मार्च ते 13 एप्रिल शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन हे शीर्षक चुकीचे आहे. ही फुटबॉल स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाची नसून राष्ट्रीय पातळीवरील खुली फुटबॉल स्पर्धा आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूटबॉल स्पर्धेचे आयोजन? : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale

Result: False Headline

Similar News