पुण्यात रक्ताच्या कर्करोगावरील रामबाण औषध मोफत उपलब्ध असल्याचा खोटा मेसेज व्हायरल

Update: 2024-07-11 17:13 GMT

कर्करोग पूर्णपणे बरा करण्याचा दावा करणाऱ्या औषधाचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, इमिटिनफ मेरसीलेट नामक औषध रक्ताचा कर्करोग पूर्ण रित्या बरा करते आणि पुण्याच्या यशोदा हेमॅटोलॉजी कँसर इन्सिट्यूटमध्ये ते मोफत उपलब्ध आहे.

पडताळणीअंती कळाले की, इमिटिनेफ मर्सिलेट या औषधाने रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा होत नाही. तर हे औषध क्रोनिक मिएलोजिनस ल्युकेमिया (CML) या ब्लड कॅन्सरला नियंत्रित ठेण्यासाठी दिले जाते.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेज मध्ये लिहिले आहे की, “पुणे येथे ब्लड कॅन्सरसाठी औषध सापडले आहे! IMITINEF MERCILET हे एक औषध आहे जे ब्लड कॅन्सर बरे करते. पुणे येथील यशोदा हेमॅटोलॉजी कर्करोग संस्थेमध्ये हे औषध विनामूल्य उपलब्ध आहे.” या ठिकाणी यशोदा हेमॅटोलॉजी कँसर इन्सिट्यूटचा नंबरदेखील देण्यात आला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल मेसेजमधील दावा भ्रामक असून अनेक वर्षांपासून हा मेसेज सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने 2015 मध्ये व्हायरल दाव्याचे खंडन करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. यामध्ये कॅन्सरतज्ज्ञ डॉ. विशाल राव यांनी बंगळुरू येथील पत्रकार परिषेदेत व्हायरल दाव्याचे खंडन केले की, “सोशल मीडियावर अशा प्रकारची अफवा वाचून लोकांची फसवणुक केली जात आहे. एकच औषध सगळ्या प्रकारचे कॅन्सर बरे करेल असा शोध अद्याप लागलेला नाही. ते चमत्कारीक औषध अद्याप तयार झालेले नाही.”

मूळ पोस्ट – टाईम्स ऑफ इंडियाअर्काइव्ह

पुढे यशोदा हेमॅटोलॉजी कॅन्सर इन्स्टीट्यूट संबंधित सर्च केल्यावर कळाले की, पुणे स्थित या हॉस्पीटलमध्ये कॅन्सरचा उपचार होतो. इन्स्टीट्यूटशी संपर्क साधल्यावर रूग्णालय प्रशासनाने सांगितले की, हा मेसेज अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असून या ठिकाणी ‘इमिटिनफ मर्सिलेट’ हे औषध मोफत मिळत नाही.

अधिक सर्च केल्यावर कळाले की, 2010 पासून हा मेसेज विविध हॉस्पीटलच्या शेअर केला जात आहे. चेन्नईतील अदयार कॅन्सर इन्स्टीट्यूटच्या नावानेदेखील हाच मेसेज व्हायरल झाला होता.

इमिटिनेफ मर्सिलेट

इमिटिनेफ मर्सिलेट (Imitinef Mercilet) हे रक्ताच्या कॅन्सरपीडितांसाठीचे एक औषध आहे.त्याला Imatinib Mesylate किंवा Gleevec या नावानेही ओळखले जाते. हे औषध क्रोनिक मिएलोजिनस ल्युकेमिया (CML) व अक्युट लिम्फोसायटिक ल्युकेमिया (ALL) यासारख्या रक्ताच्या कॅन्सरला नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरले जाते. तसेच कॅन्सरच्या औषधोपचरातील एक घटक आहे.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल मेसेज भ्रामक आहे. इमिटिनेफ मर्सिलेट हे औषध रक्ताचा कर्करोग पूर्णतः बरा करत नाही. क्रोनिक मिएलोजिनस ल्युकेमिया (CML) या रक्ताच्या कर्करोगला नियंत्रित ठेवण्यासाठी हे औषध वापरले जाते. हा मेसेज अनेक वर्षांपासून भ्रामक दाव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:पुण्यात रक्ताच्या कर्करोगावरील रामबाण औषध मोफत उपलब्ध असल्याचा खोटा मेसेज व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Tags:    

Similar News