महाराष्ट्रात ‘एलियन प्राणी’ आल्याची अफवा व्हायरल; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Update: 2020-09-12 04:38 GMT

कोरोनामुळे जग आधीच हैराण असताना वरच्यावर नवनवीन अचंबित करणाऱ्या घटना समोर येत आहेत. आता अशा वावड्या उठल्या की, गुजरातहून महाराष्ट्रात एक विचित्र दिसणारा प्राणी आला आहे. परग्रही जीव भासावा अशा या प्राण्याने अनेकांवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या कथित प्राण्याचे फोटो शेयर करून शेतकऱ्यांना एकटे शेतात न जाण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही फेक न्यूज असल्याचे आढळले.

काय आहे दावा?

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअप हेल्पलाईनवर तीन फोटो आणि एक व्हिडियो पाठवला. यामध्ये दोन फोटो या विचित्र प्राण्याचे असून तिसऱ्या फोटोत हात जखमी झालेला दिसतो. व्हिडियोमध्ये एक जण पोटावरील जखम दाखवतो. यासोबत मेसेज शेयर केला जातोय की, “सर्व शेतकरी बाधव याना निवेदन आहे कि आपण शेता मध्ये जात आसताना ऐकटे जाऊ नका. का तर खुपच खतरनाक जनावर गुजरात मधून आपल्या म्हाराष्ट्रात प्रवेश करत आहे. हि खोटी बातमी नाही. हे पाहा.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम हा प्राणी कोणता आहे ते शोधले. त्याकरिता गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता, एका ब्लॉग पोस्ट आढळली. यामधील माहितीप्रमाणे, लाईरा मागनुको नावाच्या एका इटालियन कलाकाराने तयार केलेल्या या मूर्ती आहेत. सिलिकॉन रबरापासून सजीवसदृश्य विचित्र प्राण्यांच्या मूर्ती तयार करण्यात त्यांची हातोटी आहे.

लाईरा मागानुको यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या या कलाकृतींचे शेकडो फोटो उपलब्ध आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या कथित प्राण्याच्या मूर्तीचे फोटो त्यांनी 3 ऑक्टोबर 2018 रोजी शेयर केले होते. ते आपण खाली पाहू शकता.

Full View

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक 

लाईरा यांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, 2014 पासून त्या अशा मूर्ती तयार करीत आहेत. इटलीसह जगभरातील आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्य कलाकृतींचे प्रदर्शन झाले आहे. आपल्या निराळ्या शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत.

सिलिकॉनपासून या मूर्ती कशा तयार करतात याचे प्रात्याक्षिक दाखवणारा एक व्हिडियो लायरा यांच्या युट्यूबवर आढळला.

https://www.youtube.com/watch?v=TwhmnUiavYc

हे तर स्पष्ट झाले की, जे फोटो व्हायरल होत आहेत ते काही खऱ्या प्राण्याचे नाहीत.

मग ते जखमी शेतकरी कोण आहेत?

सदरील व्हिडियो नीट ऐकल्यानंतर लक्षात आले की, त्यातील भाषा उत्तर गुजरातमध्ये बोलली जाते. आमच्या गुजराती भाषिक सहकाऱ्याने त्यानुसार माहिती घेतली असता कळाले की, गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेतकरी जखमी झाले होते. त्या जखमी शेतकऱ्यांचा हा व्हिडिओ आणि फोटो आहे.

दैनिक भास्करने या घटनेविषयी बातमीदेखील केली होती. त्यानुसार, 26 ऑगस्ट रोजी राजस्थान सीमेला लागून असलेल्या गावात बिबट्याने हल्ला केला होता.

एबीपी अस्मिता वाहिनीवरील बातमी तुम्ही पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=9m63WSFlvkw

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, गुजरातहून विचित्र दिसणारा प्राणी महाराष्ट्रात आल्याची निव्वळ अफवा आहे. इटलीमधील एका कलाकाराने तयार केलेल्या मूर्तीचे ते फोटो आहेत. तसेच जखमी शेतकऱ्यांचे फोटो गुजरातमधील बिबट्याने हल्ला केल्याचे आहेत. त्यामुळे भीती पसरविण्याचे काही कारण नाही.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:महाराष्ट्रात ‘एलियन प्राणी’ आल्याची अफवा व्हायरल; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Fact Check By: Agastya Deokar

Result: False

Tags:    

Similar News