निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे का ? वाचा सत्य

Update: 2024-03-06 11:51 GMT

सध्या महाराष्ट्रमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्व राजकीय पक्ष आगामी निवडणुकीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत.

याच पर्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या नावाने एक पत्रक व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीचे सार्वत्रिक तपशील वेळापत्रक जारी केले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे पत्रक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पत्रक बनावट असून निवडणूक आयोगाने ते जारी केलेले नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल पत्रकामध्ये लिहिलेले आहे की, 2024 सार्वत्रिक निवडणुकीचे तपशील पुढील प्रमाणे आहे की, निवडणूक अधिसूचना किंवा आचारसंहिता 12 मार्च रोजी लागू होईल, नामांकन 28 मार्च रोजी भरण्यात येईल, मतदान दिवस 19 एप्रिल रोजी असेल, मतदान मोजणी 22 मे रोजी करण्यात येईल आणि नवीन सरकारची स्थापना 30 मे रोजी करण्यात येईल.”

हे पत्रक शेअर कताना युजर्स लिहितात की, “लोकसभा निवडणूक 2024 तारीख जाहीर 12 मार्चपासून आचारसंहिता लागू 22 मे ला निकाल.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम निवडणूक आयोगाने असे कोणते पत्रक जारी केले असते तर ही एक मोठी बातमी ठरली असती. परंतु, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक घोषणा केल्याची बातमी आढळली नाही.

उलट निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी आपल्या ट्विटर आकाउंटवरून स्पष्ट केले की, “व्हायरल होत असलेले पत्रक बनावट असून निवडणूक आयोगाने अद्याप लोकसभा निवडणूकची तारीख जारी केली नाही.”

https://twitter.com/ECISVEEP/status/1761278667940872538?s=20

लोकसत्ताच्या बातमीनुसार आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या निवडणुकीत प्रचार करताना धर्म, जात, भाषेच्या आधारावर मतं मागू नयेत, प्रार्थनास्थळांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग करू नये, देव आणि भक्त यांच्यातील नात्याचा अवमान होईल अशी विधाने करू नयेत, विभाजनवादी प्रचार करू नये. तसेच मतदारांची दिशाभूल करणारे विधान करू नये. असे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सांगितले आहे. संपूर्ण बातमी आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल पत्रक बनावट असून निवडणूक आयोगाद्वारे जारी करण्यात आलेले नाही. अद्याप लोकसभा निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. चुकीच्या दाव्यासह पत्रक व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली आहे का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Tags:    

Similar News