तथ्य पडताळणी : कोहिनूर मिल परिसरात दगडफेक झाली का?

Update: 2019-05-25 08:32 GMT

(फोटो सौजन्य : मुंबई लाईव्ह)

कोहिनुर मिल परिसरात आज कुणीही जाऊ नका. कुणीतरी येणाऱ्या जाणाऱ्यावर दगड फेकत आहे म्हणे, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर पसरत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

Full View

अक्राईव्ह

तथ्य पडताळणी

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या ट्विटर अकाऊंटवर आम्ही अशी काय घटना घडली का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यावेळी अशी कोणतीही घटना घडली असल्याचे आम्हाला दिसून आले नाही. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरही याबाबतची कोणतीही माहिती आढळून आली नाही. मुंबईतुन प्रसिध्द होणाऱ्या मिड-डे या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर असे कोणते वृत्त दिसते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या ठिकाणीही असे कोणतेच वृत्त दिसून आले नाही.

अक्राईव्ह

निवडणूक निकालाच्या दिवशीच कोहिनुर मिलविषयी असे वृत्त का पसरविण्यात येत असावे याचाही आम्ही शोध घेतला तेव्हा आम्हाला खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार शिवसेना नेते मनोहर जोशी, मनसे नेते राज ठाकरे आदींचे यांचा या ठिकाणाशी कधीकाळी संबंध असल्याचे दिसून येते. 15 नोव्हेंबर 2009 रोजी हे वृत्त इकोनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रात प्रसिध्द झालेले आहे. त्यानुसार या परिसराशी या राजकीय नेत्यांचा या परिसराशी कधीकाळी असलेला संबंध दिसून येतो.

अक्राईव्ह

या ठिकाणची सध्यस्थितीही आम्हाला एबीपी माझाच्या 05 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द झालेल्या या वृत्तातुन दिसून आले.

अक्राईव्ह

निष्कर्ष

कोहिनुर मिल परिसरात 23 मे रोजी दगडफेक झाल्याचे वृत्त कुठेही दिसून येत नाही. या भागाशी राजकीय नेत्यांचे असलेले संबंध लक्षात घेता ही माहिती कदाचित जाणीवपूर्वक पसरविण्यात आली असावी. ही पसरविण्यात येणारी माहिती खोटी आणि चुकीची आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:तथ्य पडताळणी : कोहिनूर मिल परिसरात दगडफेक झाली का?

Fact Check By: Dattatray Gholap

Result: False

Similar News