अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी “भारत माता की जय” म्हटले का?

By :  amruta
Update: 2019-06-08 08:11 GMT

जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी “भारत माता की जय” म्हंटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या खाली लोकसभा 2019 नंतर नवीन केंद्रीय मंत्रीमंडळमधील मंत्री अमित शहा हे गृहमंत्री झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी “भारत माता की जय” असे म्हटले असा दावा सोशल मीडियावरील पोस्टमध्ये करण्यात आलेला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी.

Full View

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये जम्मू – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा 30 सेकंदाचा व्हिडिओ दाखविण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये ते “भारत माता की जय” असा नारा देत, उपस्थित समुहाला देखील “भारत माता की जय” असे म्हणण्यास सांगत आहेत. या व्हिडिओसंदर्भात पोस्टमध्ये अमित शहा गृहमंत्री बनतेही फारुख अब्दुल्ला कैसे सुधर गये ... धाक इसे कहते है असे लिहिले आहे.

या पोस्टसंदर्भात सत्य शोधण्यासाठी आम्ही गुगलवर फारुख अब्दुल्ला “भारत माता की जय” असे सर्च केले. त्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मृत्यूनंतर सर्वपक्षीय शोकसभा घेण्यात आली त्यावेळी केलेल्या भाषणात “भारत माता की जय” असे म्हटल्याचे आढळले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर भाजप सरकारकडून 22 ऑगस्ट रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होतो. ही शोकसभा सर्वपक्षीय तसेच सर्वसामान्य जनतेसाठीही होती.

The Tribune l अर्काईव्ह

या शोकसभेमध्ये जम्मू – काश्मीर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या शोकसंदेशात शेवटी “भारत माता की जय” असा नारा दिला होता. याविषयीची बातमी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे.

DNA l अर्काईव्ह

सोशल मीडियावर असणारी 28 सेकंदाची फारुख अब्दुल्ला यांची “भारत माता की जय” असे म्हणणारी व्हिडिओ क्लिप आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या सर्वपक्षीय शोकसभेततील फारुख अब्दुल्ला यांचा शोकसंदेश आपण खाली दिलेल्या लिंकवर पाहू शकता.

https://youtu.be/hiO6H23XZNs

निष्कर्ष : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जम्मू – काश्मीर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा “भारत माता की जय” हा व्हिडिओ अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीचा असून, मुळ व्हिडिओ हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेतील आहे. त्यामुळे पोस्टमध्ये व्हिडिओ संदर्भात करण्यात आलेला अमित शहा गृहमंत्री बनतेही फारुख अब्दुल्ला कैसे सुधर गये...धाक इसे कहते है हा दावा असत्य आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:अमित शहा गृहमंत्री झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी “भारत माता की जय” म्हटले का?

Fact Check By: Amruta Kale

Result: False

Similar News