फरिदाबाद येथील मतदान केंद्राचा ‘हा’ व्हिडिओ खरा आहे का?

By :  amruta
Update: 2019-05-14 17:57 GMT

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण व्यक्ती मतदान केंद्राच्या आतमधील खोलीमध्ये जेव्हा मतदानासाठी तीन महिला आल्यात, त्यांना भाजपचे बटन दाबण्याची सक्ती केली. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी.

Full View

फेसबुकअर्काईव्ह

सत्य पडताळणी

पोस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक तरुण मतदान केंद्रावर मतदान सुरु असतांना तीन वेळा आपल्या जागेवरुन उठून मतदान यंत्र इव्हीएमच्या दिशेने जावूऩ तीन महिलांच्या मतदानाच्या वेळी त्यांना ठराविक एका पक्षाचे बटन दाबण्यासाठी दबाव आणताना दिसून आले आहे. या व्हिडिओच्या वर हरियाणातील फरीदाबादमध्ये बूथ कॅप्चरिंगचा प्रकार समोर आला असून, येथील एका मतदान केंद्रावर भाजपचा पोलिंग एजंट राजरोसपणे इव्हीएमजवळ जावून बटन दाबत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पहा व्हिडिओ असे लिहिलेले आहे.

सर्वात प्रथम फॅक्ट क्रिसेंडोने या व्हिडिओसंदर्भात गुगलवर सर्च केले. त्यानंतर पोस्टमध्ये व्हायरल होणाऱ्या व्हिडिओविषयी 12 मे 2019 रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे हे कळले. तसेच ह्या व्हिडिओमध्ये आपल्या जागेवरुन तीन वेळा उठणारा तरुण हा भाजपचाच पोलिंग एजंट आहे दे देखील स्पष्ट झाले.

लाईव्ह हिंदुस्तान डॉट कॉमअर्काईव्ह

एनडीटीव्ही इंडियाअर्काइव्ह

निवडणूक आयोगाने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून, ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर 12 मे 2019 रोजी ट्विट करण्यात आले आहे. त्या व्यक्तीला पकडण्यात आले असून, केवळ तीन महिलांच्या बाबतीतच या मतदान केंद्रावर असा प्रकार घडला आहे, असे म्हणण्यात आले आहे.

https://twitter.com/OfficeFaridabad/status/1127634723369394176

या पोलिंग एजंटचे नाव गिरीराज असून, त्याला निवडणूक आयोगाकडे आलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली. 19 मे रोजी फरिदाबाद येथील असावटी येथे पुन्हा एकदा मतदान घेण्यात येणार आहे. आसावटी येथील बूथ नंबर 84 या जागी बूथ कॅप्चरिंग करण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. याविषयी युट्युबवर पंजाब केसरी हरियाणा या चॅनलवर 14 मे 2019 रोजी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.

https://www.youtube.com/watch?v=STM8W9R5MZc

निष्कर्ष :  सोशल मीडियावर व्हायरल होणारा फरीदाबाद मतदान केंद्राचा पोस्टमधील व्हिडिओ खरा आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:फरिदाबाद येथील मतदान केंद्राचा ‘हा’ व्हिडिओ खरा आहे का?

Fact Check By: Amruta Kale

Result: False

Similar News