भास्कर जाधव स्वत:ला कुत्रा म्हणाले नाही; खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल

Update: 2024-08-06 17:23 GMT

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणतात की, "भास्कर जाधव म्हणजे काय ? त्याला कोणी तरी सांगितल की, दोन बिस्किट देतो जा त्याला चावून ये, तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव."

दावा केला जात आहे की, भास्कर जाधव यांनी स्वत:लाच कुत्रा म्हटले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड असून भास्कर जाधव नितेश राणेंनी म्हटलेले वाक्य सभागृहात सांगत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये भास्कर जाधव सभागृहात बोलताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, भास्कर जाधव यांनी स्वतःच मान्य केले..!

Full View

मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे.

सामना ऑनलाइन या फेसबुक पेजवर भास्कर जाधवांच्या वक्तव्याचा सविस्तर व्हिडिओ 27 डिसेंबर 2021 रोजी अपलोड करण्यात आला होता.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “आमदार नितेश राणे यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या कृतीचा शिवसेना आमदारांनी निषेध केला आहे. विधानसभेत याबाबत झालेल्या चर्चेवेळी आमदार सुहास कांदे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे.”

Full View

या व्हिडिओमध्ये 9:15 मिनिटावर भास्कर जाधव म्हणतात की, “या सभागृहमध्ये 5 जुलै 2021 रोजी तुमचे (भाजप) 12 आमदार निलंबित झाले आणि योगायोगाने त्या ठिकाणी चेअरवर (विधानसभा अध्यक्ष पदावर) मी होतो. यानंतर विधानसभेच्या पायऱ्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी अभिरूप विधानसभा भरवली त्या वेळेला हेच सदस्य अनेक वक्तव्य करत असताना निलेश राणे यांनी चंद्रकांत दादांना उद्देशून म्हणाले की, भास्कर जाधव म्हणजे काय ? त्याला कोणी तरी सांगितल की, दोन बिस्किट देतो जा त्याला चावून ये, तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, असे निलेश राणे क्लिपमध्ये म्हणाले.” संपूर्ण बातमी आपण येथे वाचू शकता.

तसेच हे वक्तव्य आपण येथे पाहू शकता.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मुळ व्हिडिओ एडिट करत निलेश राणेंचा उल्लेख हटवून भ्रामक दाव्यासह अर्धवट क्लिप पसरवली जात आहे.

https://youtu.be/dvzISanSnPE

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. 2021 मध्ये भास्कर जाधव आपल्या विरोधात निलेश राणेंनी उद्गारलेले वाक्य सभागृहासमोर मांडत होते. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

.container {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.container::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.container img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.container span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.container {

text-align: center;

}

.container img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:भास्कर जाधव स्वत:ला कुत्रा म्हणाले नाही; खोट्या दाव्यासह एडिटेड व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: Altered

Tags:    

Similar News