राहुल गांधींनी 'जनतेला लुटण्याच्या 101 आयडिया' या नावाचे पुस्तक लाँच केले का ? वाचा सत्य

Update: 2024-04-11 14:13 GMT

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांच्या हातात 'जनतेला लुटण्याच्या 101 आयडिया' या नावाचे पुस्तक दिसते. दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी हे पुस्तक लाँच केले या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी यांचा हातात एक पुस्तक दिसते. ज्यामध्ये राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिक अर्जून खर्गे आणि काँग्रेस पक्षाचे चिन्ह दिसते. पुस्तकाचे शीर्षक 'भारतीय राष्ट्रीय काँग्रेस न्यायपत्र 2024' असे दिसते.

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटोमधील पुस्तकाचे शीर्षक एडिट करून बदलण्यात आला असून मुळ फोटो काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याचा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने 5 एप्रिल 2024 रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.

काँग्रेसने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर जाहीरनामा प्रसिद्ध करतानाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते.

खालील व्हिडिओमध्ये 3 मिनिट 49 सेकंदावर पाहिल्यावर आपल्या जाहीरनाम्याचे शीर्षक “जनतेला लुटण्याच्या 101 आयडिया” असे दिसते.

https://www.youtube.com/live/s3ZgHRRcNeg?si=lEnBViTObEI3ZgEm&t=229

काँग्रेसने आपल्या अधिकृ वेबसाईटवर जाहीरनामा प्रसिद्ध करतानाचा फोटो शेअर केला आहे.

मूळ पोस्ट – काँग्रेस

खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ फोटोला एडिट करून त्या ठिकाणी जाहीरनाम्याचे शीर्षक बदलून त्या ठिकाणी 'जनतेला लुटण्याच्या 101 आयडिया' असे खोटे शीर्षक देण्यात आहे.

काँग्रेस जाहीरनामा

लोकसत्ताच्या बातमीनुसार दिल्लीत पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि 25 गॅरंटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये युवा, रोजगार, मजूर, महिलांना 1 लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह 30 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. अधिक माहिती आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो बनावट आहे. मूळ फोटोमध्ये राहुल गांधींच्या हातात “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस न्यायपत्र 2024.” शीर्षक असलेला जाहीरनामा आहे. खोट्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:राहुल गांधींनी 'जनतेला लुटण्याच्या 101 आयडिया' या नावाचे पुस्तक लाँच केले का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Altered

Tags:    

Similar News