दिग्दर्शक नव्हे तर अभिनेता साजिद खानचे निधन झाले आहे; सारख्या नावांमुळे संभ्रम

Update: 2024-01-01 18:03 GMT

काही दिवसांपूर्वी सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या साजिद खान नामक कलाकाराचे निधन झाले. सोशल मीडियावर अनेकांचा गैरसमज झाला की, ते कलाकार म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान होते. त्यामुळे अनेक वेबपोर्टल्सने तर दिग्दर्शक साजिद खान यांच्या फोटोसह निधनाची बातमी प्रसिद्ध केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही बातमी आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, चित्रपट दिग्दर्शक साजिद खान यांचा निधन झालेले नाही. मुळात अभिनेते साजिद मेहबूब खान यांचे निधन झालेले आहे. एकसारख्या नावामुळे हा संभ्रम निर्माण झाला.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये दिग्दर्शक साजिद खान यांच्या फोटोसह लिहिलेल आहे की, “प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक साजिद खान यांचे निधन.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल दावा भ्रमक आहे. ‘हे बेबी’, ‘हाऊसफूल’ यांसारख्या विनोदी चित्रपटांचे दिग्दर्शक साजिद खान यांचे निधन झालेले नाही.

सोशल मीडियावर तशी अफवा पसरल्यानंतर दिग्दर्शक साजिद खान यांनी स्वतः खंडण करत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला. ज्यामध्ये ते म्हणाले की, “मी जीवंत आणि सुखरूप आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्या अभिनेत्याचे नावसुद्धा साजिद खानच आहे. त्यांनी ‘मदर इंडिया’ (1957) चित्रपटामध्ये सुनील दत्तची बालपणाची भूमिका साकारली होती. माझा जन्म 1970 सालचा आहे. एकसारख्या नावामुळे हा गोंधळ झाला आहे.”

https://www.instagram.com/reel/C1YkItXI2Wk/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

कोण होते अभिनेते साजिद खान?

नुकतेच निधन झालेल्या अभिनेत्याचे पूर्ण नाव साजिद मेहबूब खान असे आहे. ते मदर इंडिया चित्रपटाचे दिग्दर्शक मेहबूब खान यांचे सुपुत्र होते.

साजिद मेहबूब खान हे दीर्घकाळ कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर 22 डिसेंबर रोजी वयाच्या 70 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

मूळ पोस्ट – इंडियन इक्सप्रेस

खालील तुलनात्मक पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मृत्यू झालेला व्यक्ती दिग्दर्शक साजिद कामरान खान नसून अभिनेता साजिद मेहबूब खान आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा खोटा आहे. चित्रपट दिग्दर्शक साजिद कामरान खान यांचा मृत्यू झालेला नाही. अभिनेते साजिद मेहबूब खान यांचे निधन झाले आहे. एक सारख्या नावामुळे हा संभ्रम निर्माण झाला. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:दिग्दर्शक नव्हे तर अभिनेता साजिद खानचे निधन झाले आहे; सारख्या नावांमुळे संभ्रम

Written By: Sagar Rawate

Result: Misleading

Tags:    

Similar News