तिरंग्याच्या अपमानाचा हा फोटो शेतकरी आंदोलनातील नाही; तो 2013 मधील आहे

Update: 2020-12-15 14:41 GMT

शेतकरी आंदोलनाविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर दुष्प्रचार सुरू आहे. अशाच एका पोस्टमध्ये काही तरुण भारतीय झेंड्याची विटंबना करतानाचा फोटो शेअर करून त्याचा संबंध सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो सुमारे सात वर्षांपूर्वीचा आहे. या फोटोचा आणि शेतकरी आंदोलनाचा काही संबंध नाही.

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये तिरंग्यावर उभे राहून बूट मारणाऱ्या तरुणाचा फोटो शेयर केलेला आहे. सोबत म्हटले की, हे कसले आंदोलन आहे. तिरंग्यासाठी किती तरी सैनिक शहीद झालेत. हे कुठल्याही भारतीय नागरिकाला सहन होणार नाही. असे करणार्‍याला गोळ्या मारण्याचे आदेश द्यावेत. मग तो कोणीही असो. बाकीचे आंदोलनात असणारे हे बघून काहीच कसे बोलत नाही, याला विरोध कसे करत नाही? याचा अर्थ त्यांचा काही वेगळा हेतू आहे का? हे कोण आंदोलनकारी आहेत? वेळीच थांबवले नाही तर सगळेच हाता बाहेर जाईल. याला विरोध न करता, पाठिंबा देणार्‍या नेत्यांच्या लाचारीची कीव येते.

या फोटोवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मूळ फोटो – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

फॅक्ट क्रेसेंडोने यापूर्वी शेतकरी आंदोलनाविषयक अनेक फेक पोस्टचे सत्य समोर आणलेले आहे. त्यामुळे या फोटोचेही सत्य जाणून घेणे आवश्यक आहे.

सर्व प्रथम या फोटो रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा फोटो तर गेल्या अनेक वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.

एक-एक करीत मागे गेल्यावर सापडले की, सध्या व्हायरल होत असलेला हाच फोटो 2017, 2016, 2014 सालीसुद्धा वापरण्यात आला आहे. म्हणजेच हा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा नाही.

मग हा फोटो कोणत्या प्रदर्शनाचा आहे?

विविध की-वर्ड्सद्वारे सर्च केल्यावर कळाले की, खलिस्तान समर्थक भारताविरोधी आंदोलन करीत असतात. इंग्लंडमधील अशाचा एका खलिस्तानी संघटनेतर्फे लंडनमध्ये 2013 आंदोलन करण्यात आले होते.

‘दल खालसा यूके’ असे या संघटनेचे नाव आहे. त्यांच्या ब्लॉग वेबसाईटवर वरील फोटप्रमाणे तिरंग्याची विटंबना करणारे अनेक फोटो उपलब्ध आहेत. सदरील आंदोलन 15 ऑगस्ट 2013 रोजी लंडनमधील भारतीय दूतावासासमोर करण्यात आले होते.

मूळ वेबसाईट – दल खालसा यूके

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, सुमारे सात वर्षांपूर्वीचा फोटो सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडून चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे. तिरंग्याची विटंबना करण्याचा हा फोटो खलिस्तान समर्थकांनी 2013 लंडनमध्ये केलेल्या प्रदर्शनाचा आहे.

.hocal_container_hocal {

border: 2px solid #000;

background-color: #eee;

border-radius: 5px;

padding: 16px;

margin: 16px 0

}

.hocal_container_hocal::after {

content: "";

clear: both;

display: table;

}

.hocal_container_hocal img {

float: left;

margin-right: 20px;

border-radius: 50%;

}

.hocal_container_hocal span {

font-size: 20px;

margin-right: 15px;

}

@media (max-width: 500px) {

.hocal_container_hocal {

text-align: center;

}

.hocal_container_hocal img {

margin: auto;

float: none;

display: block;

}

}

Title:तिरंग्याच्या अपमानाचा हा फोटो शेतकरी आंदोलनातील नाही; तो 2013 मधील आहे

Fact Check By: Agastya Deokar

Result: False

Tags:    

Similar News