पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नष्ट केला आहे. त्यानंतर सोशल मीडिया आणि अनेक वृत्तस्थळांवर या हल्ल्याचा एक व्हिडियो व्हायरल होत आहे. खास रे या संकेतस्थळावरदेखील 26 फेब्रुवारीला एका बातमीत या हल्ल्याचा व्हिडियो असल्याचा दावा केला आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या बातमीची तथ्य पडताळणी केली आहे.

मूळ बातमी येथे वाचा – खास रेअर्काइव्ह

पडताळणी करेपर्यंत ही बातमी खास रे, मराठी, मराठा असा विविध फेसबुक पेजेसवर एक हजारपेक्षा जास्त वेळा शेयर करण्यात आली होती.

खास रे-फेसबुक अर्काइव्हमराठी-फेसबुक अर्काइव्हमराठा-फेसबुक अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

बातमीमध्ये दिलेल्या पुढील व्हिडियोमध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांनी केलेल्या कारवाईचा असल्याचे म्हटले आहे. व्हिडियोमध्ये एक विमान एयर ब्लास्ट करताना दिसत आहेत. तो येथे पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?time_continue=8&v=dEwA64CxQC8

हा व्हिडियो अनबिलिव्हेबल व्हिडियोज नावाच्या यूट्यूब चॅनेलने 25 फेब्रुवारी रोजी अपलोड केला आहे. परंतु, भारतीय वायू सेनेने 26 फेब्रुवारी पहाटे 3.30 वाजता हल्ला केला. त्यामुळे हा व्हिडियो भारताच्या हल्ल्यापूर्वीचा आहे.

भारताने हल्ल्याची माहिती दिल्यानंतर सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवर हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला. ट्विटरवरदेखील याबाबत नेटिझन्समध्ये प्रचंड चर्चा होत आहे.

त्यामुळे फॅक्ट क्रसेंडोने या व्हिडियोबाबत आणखी सखोल संशोधन केले. ट्विटर वरील हॅशटॅग वापरून आम्ही #PAF ने सर्च केले. तेव्हा खालील व्हिडियो आढळला.

https://twitter.com/MiaanSayss/status/1099715252760047616

ट्विटर-अर्काइव्ह

आदिल नावाच्या एका यूजरने 24 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 8.58 वाजता हा व्हिडियो ट्विट केला होता. त्यात लिहिले की, “आदल्या रात्री F-16 विमानांनी फोर्ट अब्बास येथे केलेले एअर ब्लास्ट”. म्हणजे हा व्हिडियोदेखील भारतीय वायू सेनेच्या हल्ल्याच्या आधीचा आहे.

यानंतर मग आम्ही (Air Blasts by F-16) असे यूट्यूबवर सर्च केले. तेव्हा खाली व्हिडियो समोर आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=OX328DfWrAQ

हा व्हिडियोदेखील 24 फेब्रुवारी 2019 रोजी अपलोड करण्यात आला आहे. इन्विसिबल सोल नावाच्या यूजरने तो अपलोड केला आहे.

24 फेब्रुवारी रोजी अपलोड केलेला व्हिडियो (Video-1) आणि खास रेच्या बातमीत देण्यात आलेला व्हिडियो (Video-2) या दोघांची फॅक्ट कॅसेंडोने तुलना केली.

https://www.youtube.com/watch?v=eFahjP476xA&feature=youtu.be

Video-1 मध्ये एक गाणे वाजत आहे तर, Video-2 मध्ये एक बॅंड म्यूझिक ऐकू येते. हा अपवाद वगळता वरील तुलनेतून हे स्पष्ट होते की, दोन्ही व्हिडियो सारखेच आहे. तसेच दोन्ही व्हिडियो भारताने बाल कोट येथे केलेल्या हल्ल्याचे नाही हेदेखील सिद्ध होते.

निष्कर्ष – असत्य

भारताने 26 फेब्रुवारीला बालकोट येथे हवाई हल्ला करून जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला आहे. मात्र सोशल मीडियावर फिरणारा हा व्हिडियो या हल्ल्याचा नाही. तो 24 फेब्रुवारीचा आहे. त्यामुळे हा व्हिडियो असत्य आहे.

Avatar

Title:हा व्हायरल व्हिडियो पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याचा नाही. वाचा सत्य

Fact Check By: Mayur Deokar

Result: False